शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाला विहिरीत ढकलून ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:31 IST

रिक्षावर झालेल्या कारवाईचा दंड भरण्याच्या कारणावरून वाद घालून धमकी देत रिक्षाचालकाला विहिरीत ढकलून जिवे ठार मारल्याप्रकरणी रिक्षामालकासह दोन जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : रिक्षावर झालेल्या कारवाईचा दंड भरण्याच्या कारणावरून वाद घालून धमकी देत रिक्षाचालकाला विहिरीत ढकलून जिवे ठार मारल्याप्रकरणी रिक्षामालकासह दोन जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विहितगाव मथुरारोड कोठुळे मळा येथे राहणारा रिक्षाचालक सुशील गायकवाड (१९) हा बुधवार (५ जून) सायंकाळी आगरटाकळी राहुलनगर येथील मोकळ्या जागेतील पडीक विहिरीत पडून मरण पावला होता. याप्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.याप्रकरणी मयत सुशीलचे वडील प्रवीण संपत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुशील याने हमीद रशीद शेख (१९) रा. समतानगर, आगरटाकळी याची रिक्षा रोजाने चालविण्यास घेतली होती. सुशील हा बिटको ते देवळाली कॅम्प या मार्गावर व्यवसाय करत होता. गेल्या ३० मे रोजी देवळाली कॅम्प झेंडा चौक येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी सुशीलची रिक्षा जप्त केली होती. त्यानंतर वडील प्रवीण हे पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताकीद देऊन ३ जूनला न्यायालयात दंड भरण्याचे सांगितले होते. दरम्यान, ४ जूनपासून रिक्षामालक हमीद हा सुशीलला फोन करून तू लवकरात लवकर दंड भर नाहीतर रिक्षा तूच ठेवून घे असे वारंवार सांगत होता. गेल्या बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुशील हा घराजवळील उद्यानात उभा असताना रिक्षामालक हमीद व त्याचे दोन मित्र हे सुशीलला रिक्षा (एमएच १५ एफयू ३०४७) हिच्यामध्ये बसवून घेऊन गेले. त्यानंतर संध्याकाळी टाकळी शिवारातील पडिक विहिरीत सुशील मयत स्थितीत आढळून आला.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखून