शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

उद्योगनगरी नाशिकमध्ये १४ जून रोजी ऑटोमेशन रोड शो; आशियातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन पाहायला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:24 IST

महाराष्ट्रातील उद्योगनगरी नाशिक येथे १४ जून २०२५ रोजी ऑटोमेशन रोड शो या विशेष औद्योगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक: महाराष्ट्रातील उद्योगनगरी नाशिक येथे १४ जून २०२५ रोजी ऑटोमेशन रोड शो या विशेष औद्योगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ताज गेटवे हॉटेल, एमआयडीसी अंबड, नाशिक येथे सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, प्रवेश पूर्णतः मोफत आहे. या शोद्वारे ऑटोमेशन एक्स्पो २०२५ (११ ते १४ ऑगस्ट, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई) या आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.

IED कम्युनिकेशन्स लिमिटेड या आयोजक संस्थेच्या पुढाकाराने होणाऱ्या या शोमध्ये ऑटोमेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), औद्योगिक इंटरनेट ऑफ थिंग्ज (IIoT) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या रोड शोमध्ये ३० आघाडीच्या कंपन्या त्यांची नविन उत्पादने, प्रणाली आणि उपाय योजना सादर करतील.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे थेट प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण ऑटोमेशन सोल्यूशन्सचा अनुभव. उपस्थितांना थेट उद्योग नेते, नवोन्मेषक, तंत्रज्ञ व तंत्रज्ञान खरेदीदारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक उद्योगांमध्ये ऑटोमेशनचा प्रभावी वापर करून कार्यक्षमता, उत्पादकता व शाश्वतता वाढविणे शक्य होईल.

“नेक्सजेन फॅक्टरीज – ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रीज फॉर सस्टेनेबिलिटी” ही मुख्य संकल्पना असून यामध्ये नाशिकसारख्या औद्योगिक शहराला भविष्यातील प्रगत उत्पादन व्यवस्थेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः एमआयडीसी नाशिक परिसरातील उत्पादन कंपन्यांना हा रोड शो नवे दरवाजे उघडून देईल.

डॉ. एम. अरोकियास्वामी, व्यवस्थापकीय संचालक, IED कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणतात, “हा रोड शो म्हणजे ऑटोमेशन एक्स्पो २०२५ चा एक मौल्यवान झलक आहे. नाशिकसारख्या औद्योगिक शहरात याचे आयोजन हे येथील उत्पादक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. यामुळे त्यांना मुंबईतील मुख्य एक्स्पोमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल.”

नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर, मालेगाव व अन्य परिसरातील ऑटोमोटिव्ह, फार्मा, वाइन, अभियांत्रिकी व अन्य क्षेत्रातील उद्योजक, अभियंते, तंत्रज्ञ व संशोधकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही प्रमुख प्रदर्शक:

ADARSH INDUSTRIESADVANTECH INDUSTRIAL COMPUTING INDIA PVT. LTD.ATREYO RESEARCH AND DEVELOPMENT LLPAXIS SOLUTIONS PVT LTDBECKHOFF AUTOMATION PVT. LTD.CONTROL TECH SOLUTIONSDYNALOG (INDIA) LTD.ELECTRONET EQUIPMENTS PRIVATE LIMITEDELPIS IT SOLUTIONS PVT LTDFINDER INDIA PVT. LTDFLIR SYSTEMS INDIA PVT LTDGENERAL INDUSTRIAL CONTROLSKALTECH SYSTEMSLUBI ELECTRONICSMATRIBOXMESSUNG SYSTEMS PVT LTDMOOTEK TECHNOLOGIES PVT LTDOMRON AUTOMATION PRIVATE LIMITEDPHOENIX CONTACT (INDIA) PVT. LTD.PRIMA EQUIPMENTPROCESS PRECISION INSTRUMENTSSENQUIRE ANALYTICSUFLOW AUTOMATIONVIRYA AUTONOMOUS TECHNOLOGIES (P) LTDYOKOGAWA INDIA LTD

कार्यक्रमाची माहिती:

कार्यक्रमः नाशिक ऑटोमेशन रोड शोदिनांक: १४ जून २०२५वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी ४:००स्थळ: ताज गेटवे, पी-१७, एमआयडीसी अंबड, मुंबई आग्रा रोड, नाशिक – ४२२०१०प्रवेश: पूर्णतः मोफतनोंदणीसाठी लिंक: https://www.viablesoft.org.in/AutomationExpo2025VD/index.aspx

ऑटोमेशन एक्स्पो २०२५ बाबत माहिती:

नेक्सजेन फॅक्टरीज: ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रीज फॉर सस्टेनेबिलिटी” या थीमसह ऑटोमेशन एक्स्पो २०२५ हे प्रदर्शन ११ ते १४ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (BEC) येथे आयोजित करण्यात आले आहे. येथे ८०० हून अधिक प्रदर्शक आपली उत्पादने व सोल्यूशन्स सादर करतील. हे भारतातील आणि जागतिक स्तरावरील सर्वात मोठे औद्योगिक ऑटोमेशन प्रदर्शन आहे.अधिक माहितीसाठी कृपया वेबसाइटला भेट द्या. - www.automationindiaexpo.com