शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

‘लेखक तुमच्या भेटीला’ आजपासून सुरूवात

By admin | Updated: August 6, 2016 01:09 IST

उपक्रम : प्रभा अत्रे, विकास आमटे, सुशीलकुमार शिंदे यांचाही सहभाग

नाशिक : ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचे शनिवार, दि. ६ आॅगस्ट ते रविवार दि. २५ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विविध लेखक तसेच साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.या उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या मुलाखत आणि बंदिशीच्या सादरीकरणाने होणार आहे. या उपक्रमांतर्गत डॉ. विकास आमटे, माजी केंद्रीय ऊर्जा आणि गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात शनिवारी (दि. ६) ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची मुलाखत तसेच बंदिशीचे सादरीकरण, बुधवारी (दि. १७) साहित्यिक तथा पत्रकार प्रा. विलास पाटील ‘अध्यात्माचा पंचनामा’ या विषयावर संवाद साधणार आहेत. शनिवारी (दि. २७) डॉ. रोहित साने हे ‘हृदयस्पर्शी संवाद’ या विषयावर आपली मते मांडणार आहेत. रविवारी (दि. २८) आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉ. श्रीकांत परांजपे ‘आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि त्याचे भारतावरील परिणाम’ या विषयावर संवाद साधणार आहेत. सप्टेंबर महिन्यात शनिवारी (दि. ३) ‘ओळख सियाचीनची’ या विषयावर अनुराधा गोरे ह्या लघुपटातून सियाचीनची माहिती उलगडून सांगणार आहेत. रविवारी (दि. ४) आनंदवनचे संचालक डॉ. विकास आमटे मुलाखत आणि चित्रफितीतून आनंदवनचा इतिहास उलगडून सांगणार आहेत. रविवारी (दि. ११) ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आरती दातार ‘गदिमा तो राजहंस एक’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. शनिवारी (दि. १७) डॉ. तारा भवाळकर ‘सीतायण काल आणि आज’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाची सांगता रविवारी (दि.२५) माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘मला भेटलेले साहित्यिक आणि त्यांचे साहित्य’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. या उपक्रमांतर्गत होणारे सगळे कार्यक्रम गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यास कूर्तकोटी सभागृहात संध्याकाळी ६.३० वाजता होणार असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.