शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:00 IST

सध्या सर्वत्र होणाऱ्या एकांकिका स्पर्धांत एकांकिकेची संहिता नवी असावी अशी अट असते. त्यामुळे पूर्वीच्या लेखकांच्या गाजलेल्या एकांकिका संहिता आजच्या पिढीतील हौशी कलाकारांना सादर करण्याची संधी मिळत नाही. तसेच रसिकांना या एकांकिका पहायलाही मिळत नाहीत. जुनी २-३ अंकी नाटके पुनर्जीवित करून नाट्य निर्माते रसिकांसाठी व्यावसायिक रंगभूमीवर सादर करतात, पण हौशी रंगभूमीवर पूर्वी गाजलेल्या एकांकिका आज कुठेही सादर होत नाहीत.

नाशिक : सध्या सर्वत्र होणाऱ्या एकांकिका स्पर्धांत एकांकिकेची संहिता नवी असावी अशी अट असते. त्यामुळे पूर्वीच्या लेखकांच्या गाजलेल्या एकांकिका संहिता आजच्या पिढीतील हौशी कलाकारांना सादर करण्याची संधी मिळत नाही. तसेच रसिकांना या एकांकिका पहायलाही मिळत नाहीत. जुनी २-३ अंकी नाटके पुनर्जीवित करून नाट्य निर्माते रसिकांसाठी व्यावसायिक रंगभूमीवर सादर करतात, पण हौशी रंगभूमीवर पूर्वी गाजलेल्या एकांकिका आज कुठेही सादर होत नाहीत. प्रयोग मालाडने ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ ही संकल्पना एकांकिका स्पर्धोत्सवाच्या रूपाने प्रत्यक्षात आणली आहेत. यासाठी नाशिकमधील कलाकारांनी तयारी सुरू केली आहे. नाशिक केंद्रातील स्पर्धेची प्राथमिक फेरी २७ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे,  मुंबईच्या उपनगरातील ‘‘प्रयोग मालाड’’ या संस्थेने २०१४ मध्ये प्रथमच ‘लेखक एक नाट्यछटा अनेक’ हा एकांकिका स्पर्धोत्सव आयोजित केला. या स्पर्धोत्सवाची संकल्पना इतर एकांकिका स्पर्धेपेक्षा वेगळी आहे. या स्पर्धोत्सवात १९७०-८०च्या दशकात गाजलेल्या एकाच लेखकाच्या एकांकिका, सोडत पद्धतीने स्पर्धक संस्थांना देण्यात येतात. ही सोडत व कार्यशाळा मुंबईत दि.१९ आॅगस्ट २०१८ रोजी होणार आहे.  हा स्पर्धाेत्सव म्हणजे लेखकाला दिलेली मानवंदना आहे, असे प्रयोग मालाडचे कार्याध्यक्ष प्रदीप देवरूखकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे हौशी कलाकारांबरोबरच व्यावसायिककलाकारही या स्पर्धोत्सवात सहभागी होऊ शकतात. ‘लेखक एक नाट्यछटा अनेक’ या स्पर्धोत्सवाला दरवर्षी प्रतिसाद मिळतो आहे. यंदा प्रथमच या स्पर्धोत्वाची प्राथमिक फेरी मुंबईसह रत्नागिरी, पुणे, नाशिक आणि सोलापूर अशा पाच केंद्रांवर होणार आहे. प्राथमिक फेरीच्या आयोजनासाठी स्थानिक संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.  नाशिक केंद्रासाठी सहआयोजन म्हणून ‘नाट्यरसिक’ नाशिक संस्थेने ‘प्रयोग मालाड’बरोबर आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. नाशिक केंद्रातील प्राथमिक फेरी २७ सप्टेंबर २०१८ रोजी नाशिकमध्ये होणार आहे, तर अंतिम फेरी दि. १३ व १४ आॅक्टोबर २०१८ रोजी मुंबईत प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह येथे होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक