शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या तरूणाची दुचाकीसह शितखड्यावरून आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:13 IST

सप्तशृंगगड : सप्तश्रृंगीमातेच्या दर्शनासाठी औरंगाबाद येथून आलेल्या तरूणाने दुचाकीसह येथील शितकड्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली.

सप्तशृंगगड : सप्तश्रृंगीमातेच्या दर्शनासाठी औरंगाबाद येथून आलेल्या तरूणाने दुचाकीसह येथील शितकड्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. या घटनेत दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून त्या तरूणाचा मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती येथे काम करणाऱ्या कामगारांनी पोलिसांना कळवली. सदर मृतत तरूणाचे नाव प्रशांत जयवतंराव मोरे (३०, राहणार, अभिनंदन सोसायटी, विटखेडा रोड, ओरंगाबाद) असे आहे. सदर तरूणाने दुचाकी क्र एम.एच.२० सी एम ५०८६ सह शितकड्यावरून आत्महत्या केली. ही आत्महत्या गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वीच केल्याची माहिती समोर आली आहे. या तरूणाचे मामा पाळे (कळवण) येथील असून झालेल्या घटनेची माहिती यांना देण्यात आली आहे. चारशे ते पाचशे फूट खोल दरीत या तरूणाचा मृतदेह चार ते पाच दिवसापासून पडून राहिल्याने मृतदेह पूर्णपणे सडून गेल्याने उग्र असा वास येत असल्याने उपजिल्हा रुग्णालय कळवण येथील डॉक्टरांना घटनास्थळी बोलविण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास अभोणा येथील पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक एस. आय खाडे, पो. कॉ. योगेश गवळी, पो.कॉ. शिंदे आदी करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक