शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादरोडला  लग्नसराईमुळे कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:34 IST

औरंगाबादरोडवर अनेक लॉन्स तसेच मंगल कार्यालयांची संख्या मोठी असल्याने त्यातच सध्या लग्नसराई सुरू झाल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका व राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे.

पंचवटी : औरंगाबादरोडवर अनेक लॉन्स तसेच मंगल कार्यालयांची संख्या मोठी असल्याने त्यातच सध्या लग्नसराई सुरू झाल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका व राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे. या नेहमीच्या वाहन कोंडीमुळे सायंकाळी औरंगाबाद रस्त्याने वाहने नेताना वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, शिवाय त्याचा परिणाम मुंबई-आग्रा महामार्गावरही होत असल्याने तेथेही तासन्तास वाहने अडकून पडत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून आग्रारोडच्या उड्डाणपुलाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल जत्रा, रासबिहारी चौफुली, अमृतधामपर्यंत चोवीस तास वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या रांगा दुतर्फा लागत असल्याने नागरिकांना इच्छितस्थळी जाण्यास विलंबसहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.लग्नसराईमुळे बहुतांशी गोरज मुहूर्तावर विवाह सोहळे असल्याने व जवळजवळ लॉन्स व कार्यालय असल्यामुळे सध्या दैनंदिन सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका चौक, मुंबई-आग्रा महामार्ग भागात तासन्तास उभे राहून वाहतूक कोंडी सोडवावी लागत असल्याचे चित्र दिसून येते.नेहमीच कोंडीमुख्य रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम जोड रस्त्यांवर होत आहे. घाईघाईत जाण्याच्या प्रयत्नात दुचाकी, चारचाकी वाहन जोड रस्त्याने बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात, मात्र रस्त्यावर उभ्या राहणाºया चारचाकी व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. मंगळवारी सायंकाळी अशाच प्रकारे सुमारे दीड तास वाहने रस्त्यावर दुतर्फा अडकून पडल्याने अखेर पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक