शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अंध, दिव्यांगांसाठी शहरातील १६ ग्रंथालयांमध्ये आॅडीओ लायब्ररी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:24 IST

नाशिक - अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडीओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडीओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य तसेच एमपीएससी अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे़

ठळक मुद्देनाशिक महापालिकेची मदतप्रत्येक केंद्रावर २०० आॅडीओ सीडी

विजय मोरे,नाशिक.नाशिक - अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडीओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडीओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य तसेच एमपीएससी अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे़

आमदार बच्चू कडू यांनी शहरातील अंध, अपंग व दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी तत्कालीन महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर या दोघांमध्ये वादावादीही झाली होती़ यानंतर शहरातील अंध-अपंगांना शिक्षणाची सोय करण्यासाठी १६ ठिकाणी आॅडीओ लायब्ररी तयार करण्यात आल्या आहेत़ तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी २० कोटी रुपयांच्या निधीचा आराखडाही तयार केला आहे़

या निधीतूनच या आॅडीओ लायब्ररीची सुविधा पुरविण्यात आल्या असून, अंध विद्यार्थ्यांना या केंद्रामधून शैक्षणिक सीडी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ याबरोबरच या प्रत्येक केंद्रावर २०० आॅडीओ सीडी उपलब्ध करून दिल्या आहेत़ या आॅडीओ लायब्ररीचा अंधांकडू चांगला उपयोग केला जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे़समाजातील अंध व दिव्यांगांना लाभ१ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नाशिक महानगरपालिकेने अंध व दिव्यांग व्यक्तींसाठी आॅडीओ लायब्ररीचे साहित्य उपलब्ध करून दिले़ मान्यवर लेखकांची पुस्तके, ग्रंथ, साहित्य हे आॅडीओ स्वरूपात असलेल्या २०० सीडी कॅसेट आहेत़ याचा लाभ समाजातील अंध व दिव्यांग नियमितपणे करतात़

- बाळासाहेब सूर्यवंशी, अध्यक्ष, भालेराव सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका, नाशिक़ 

आॅडीओ लायब्ररी असलेली ग्रंथालये* अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिका, नवीन पंडित कॉलनी़* बाळ गणेश फाउंडेशन, पंडित कॉलनी़* माई लेले विकास विद्यालय, गंगापूर रोड़* एनएफबीएम अंधासाठी व्यवसाय केंद्र, कृषीनगर* राष्ट्रमाता जिजाऊ वाचनालय, भद्रकाली* शासकीय अंधशाळा, नाशिक पुणे रोड* समर्थ अभ्यासिका, गंगापूर रोड* नागरिक अभिनव वाचनालय, देवी चौक, नाशिकरोड* महापालिका सार्वजनिक वाचलनालय, नाशिकरोड* नॅब, एमआयडीसी सातपूर* लोकमान्य वाचनालय, मेरी* सार्वजनिक वाचनालय, म्हसरूळ* सार्वजनिक वाचनालय, मखमलाबाद* डॉ़ फडके वाचनालय, खुटवडनगर* शिल्पकार भालेराव वाचनालय, जाणता राजा कॉलनी, पंचवटी* सार्वजनिक वाचनालय, हनुमानवाडी, पंचवटी़

टॅग्स :Nashikनाशिकlibraryवाचनालय