शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणेशवाडीतील मंडईसाठी पुन्हा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:32 IST

गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटीतील गणेशवाडी येथील वापराविना पडून असलेल्या भाजीमंडईचा वापर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. आता या मंडईसाठी लवकरच लिलाव काढण्यात येणार आहेत.

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटीतील गणेशवाडी येथील वापराविना पडून असलेल्या भाजीमंडईचा वापर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. आता या मंडईसाठी लवकरच लिलाव काढण्यात येणार आहेत. यापूर्वी या मंडईसाठी काढण्यात आलेले लिलाव आणि वाटपाची प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याने आता किती विक्रेते त्यात सहभागी होतात, याकडे लक्ष लागून आहे.  पंचवटीत गोदाकाठी वर्षानुवर्षे भरणारा भाजीबाजार हटविण्यासाठी २००२-२००३ मध्ये हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांना हटविण्यात आले खरे परंतु हा बाजार पुन्हा वसल्याने अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, नूतन मंडईत या भाजीविक्रेत्यांना जागा देण्यासाठी त्यावेळी महापालिकेने ओट्यांचे लिलाव काढले होते. पंचवटी विभागीय कार्यालयात त्यासाठी सोडत काढण्यात आली होती. भाजीविक्रेत्यांनी त्यावर बहिष्कार टाकला असला तरी काही प्रमाणात विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता. मात्र त्यांनीही नंतर स्थलांतरला प्रतिसाद दिला नाही. गेल्या काही वर्षांपासून बाजार भरण्याच्या विरोधात महापालिकेने गोदा नदीच्या प्रदूषणाचे निमित्त करून पालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. तेव्हापासून भाजीबाजार भरणे बंद झाले आहे.फूलबाजार स्थलांतर शक्यभाजीमंडई बांधूनही वापराविना पडून असल्याने यापूर्वी महापालिकेने तेथे भाजीबाजार स्थलांतर ठरविले होते. मात्र, तेथे आवश्यक त्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. काही प्रमाणात फूलविक्रेते त्याठिकाणी व्यवसाय करतात, मात्र काही भाजीविक्रेते संबंधित विक्रेत्यांना धमकी देतात आणि व्यवसाय करण्यास प्रतिबंध करतात. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारीदेखील फूलविक्रेत्यांना ही जागा तात्पुरती असल्याचे सांगत असल्याने अडचण निर्माण होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका