नाशिक : ‘क्लोज टू नेचर’ या जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्सच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय फेसबुक आॅनलाइन आॅन दी स्पॉट लॅण्डस्केप पेंटिंग स्पर्धेत नाशिकचे चित्रकार अतुल भालेराव यांच्या चित्राने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.संघटनेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून सदर स्पर्धा घेण्यात येत असून, कलाक्षेत्रात या स्पर्धेमुळे कुतूहल जागृत झालेले आहे. प्रत्येक महिन्याच्या स्पर्धेतून एका उत्कृष्ट चित्रकाराची निवड त्याने पाठविलेल्या कलाकृतीतून केली जाते. आॅक्टोबर महिन्याचा उत्कृष्ट चित्रकार म्हणून सारडा कन्या विद्यामंदिरचे कलाशिक्षक व चित्रकार अतुल भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. अशा १८ महिन्यांच्या विजेत्या चित्रकारांमधून पुन्हा स्पर्धा घेऊन उत्कृष्ट चित्रकाराची निवड केली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. भालेराव यांच्या ‘कुंभमेळा’ या चित्रास पुरस्कार दिला जाणार आहे.
आॅनलाइन पेंटिंग स्पर्धेत अतुल भालेराव सर्वप्रथम
By admin | Updated: November 16, 2015 22:56 IST