शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांच्या माघारीवर पुरवठा खात्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाने प्रलंबित मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी पुकारलेला बेमुदत संप दुसºया दिवशीही कायम असला तरी, नाशिक जिल्ह्णात संपकरी रेशन दुकानदारांमध्ये फूट पडल्यामुळे प्रशासन आशावादी असून, आणखी दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्याविरुद्ध कारवाईचा विचार केला जात आहे.मंगळवारपासून (दि. १) राज्यातील रेशन दुकानदारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाने प्रलंबित मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी पुकारलेला बेमुदत संप दुसºया दिवशीही कायम असला तरी, नाशिक जिल्ह्णात संपकरी रेशन दुकानदारांमध्ये फूट पडल्यामुळे प्रशासन आशावादी असून, आणखी दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्याविरुद्ध कारवाईचा विचार केला जात आहे.मंगळवारपासून (दि. १) राज्यातील रेशन दुकानदारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत संप पुकारला असून, मागण्या मान्य होईपर्यंत धान्य न उचलण्याचे व वितरित न करण्याचे जाहीर केले आहे. बुधवारी दुसºया दिवशीही संप कायम असला तरी, नाशिक जिल्ह्णातील काही रेशन दुकानदारांनी या संपात सहभागी न होण्याचे ठरविले आहे. साधारणत: २६०० दुकानदारांपैकी ११०० दुकानदार संपात सहभागी नाहीत, त्यामुळे नाशिक जिल्ह्णात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही दुकानदारांनी बुधवारी धान्य उचलण्यासाठी चलने भरली आहेत. या संपाबाबत रेशन दुकानदारांमध्ये फूट पडल्यामुळे काहींनी संघटनेचे आदेश असल्यामुळे संप करावा लागत असल्याची कबुली प्रशासनाकडे दिली असून, येत्या दोन दिवसात संप मिटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरवठा खात्यानेही आस्ते कदम उचलण्याचे ठरविले आहे.