शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्या सभेकडे उत्तर महाराष्ट्राचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:26 IST

राज्यातील शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली असून, उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शनिवारी सायंकाळी चार वाजता येथील गोल्फ क्लब मैदानावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीची तयारी : दहा वर्षानंतर राष्टÑवादी बळ अजमाविणार सुमारे दिड लाख नागरिक या सभेसाठी उपस्थित राहतील असा दावा

नाशिक : राष्टÑवादीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोप सभेनंतर तब्बल दहा वर्षानंतर पहिल्यांदाच येथील गोल्फ क्लब मैदानावर शरद पवार व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जाहीर सभा होत असून, वर्षभरावर येवून ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीबरोबरच आगामी काळात सत्ताधाºयांशी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना या सभेतून दिला जाणार आहे. शनिवारी सकाळी पक्ष नेत्यांचे शहरात आगमन होणार असून, त्यानिमित्ताने शहरात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.राज्यातील शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली असून, उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शनिवारी सायंकाळी चार वाजता येथील गोल्फ क्लब मैदानावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, खासदार सुप्रीया सुळे, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार असून, त्यादृष्टीने जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्टÑवादीचे स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. सुमारे दिड लाख नागरिक या सभेसाठी उपस्थित राहतील असा दावा केला जात असून, त्यासाठी ठिकठिकाणी बैठका, मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे, शिवाय शहरात फलक, झेंडे, बॅनर लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. राष्टÑवादी या निमित्ताने उत्तर महाराष्टÑातील आपले बळ अजमाविणार आहे.केंद्र व राज्यातील बदललेल्या राजकीय समिकरणाच्या पार्श्वभुमीवर होत असलेल्या या जाहीर सभेत शरद पवार काय संबोधित करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असले तरी, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची सुरू असलेली तयारी, अलिकडेच झालेल्या पुर्वाेत्तर तीन राज्यांच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी बजावलेली भुमिका, राष्टÑपुरूषांच्या पुतळ्यांची झालेली विटंबना, एनडीए सरकारमधून तेलगु देसम सारख्या पक्षाने घेतलेली फारकत या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना सत्ताधाºयांच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्षाचा संदेश देण्याचा व त्याचनिमित्ताने निवडणुकीची तयारी करण्याचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक