नाशिक : कौटुंबिक कारणातून एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना निफाड तालुक्यातील उगाव येथे घडली़ या चौघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़निफाड तालुक्यातील उगाव येथे राहणारे पगारे कुटुंबीयातील रंजना कारभारी पगारे (४५), शीतल कारभारी पगारे (२२), दीपक कारभारी पगारे (२४) व कारभारी दमाजी पगारे (४५) यांनी घरातील कौटुंबिक वादातून विषारी औषध सेवन करण्यात आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला़ गेल्या काही दिवसांपासून पगारे कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण होते़ त्यातच पगारे कुटुंबीयांतील दोन सुनांचा मृत्यू झाला आहे़ यातील पहिल्या सुनेने पगारे कुटुंबीयांविरुद्ध छळाची तक्रार दाखल केलेली आहे़ या तणावातून या चौघांनी विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले जाते़ (प्रतिनिधी)
एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्त्येचा प्रयत्न
By admin | Updated: May 10, 2015 00:11 IST