शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भावलीचे पाणी रोखण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 16:48 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला शुक्रवारी इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कडवा विरोध करीत आक्र मक आंदोलन केले.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला शुक्रवारी इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कडवा विरोध करीत आक्र मक आंदोलन केले. आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भावली धरणाचे सोडण्यात आलेले पाणी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. तर शिवसेनेने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडू न देण्यासाठी कालपासून सुरु केलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम ठेवल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून मेंगाळ यांच्यासह दीडशे शिवसैनिक आणि शेतकºयांना ताब्यात घेतले.जलसंपदा विभागाने गुरुवार (दि.२५) पासून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकरीता इगतपुरीतील दारणा धरण समूहातील वाकी खापरी,भाम,व भावली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली. सदर पाणी दारणा धरणात येणार असून दारणातून जायकवाडी करीता विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान सदर पाणी सोडल्यानंतर इगतपुरीतील सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी संतप्त झाले. त्यांनी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे गोरख बोडके,उमेश खातळे, मनसेचे संदीप किर्वे,मूळचंद भगत,रामदास आडोळे,कैलास भगत आदींच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी भावली धरणावर येत प्रचंड घोषणाबाजी केली आणि पाणी रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, दारणा धरणातून जायकवाडीला एक थेंब पाणी देणार नाही असा आक्र मक पवित्रा घेत कालपासून मेंगाळ यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.आज दुसºया दिवशीही आंदोलन चालू ठेऊन आंदोलक जलसमाधी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असताना पोलिसांनी आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत मेंगाळ यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Nashikनाशिक