शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

एलबीटीच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: May 4, 2015 01:27 IST

एलबीटीच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न

नाशिक : राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्स रद्द करण्याची घोषणा केल्याने चार महिन्यांत एलबीटीच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न प्राप्त करून घेण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले असून, आतापासूनच व्यापारी-व्यावसायिकांना वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याचे आवाहन केले आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही व्यापाऱ्यांकडून विवरणपत्र दाखल करण्यास टाळाटाळ झाल्यास त्याचा पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याचा धसका प्रशासनाने घेतला आहे. नियमानुसार स्थानिक संस्था कर नोंदणीधारकांनी आर्थिक वर्ष संपल्यानंतर ९० दिवसांच्या आत म्हणजेच २९ जूनपर्यंत परिपूर्ण वार्षिक विवरणपत्र महापालिकेकडे सादर करणे बंधनकारक आहे. व्यापारी-व्यावसायिकांनी आयात केलेला माल आणि जमा केलेली एलबीटीची रक्कम तपासून पाहण्यासाठी विवरणपत्र महत्त्वाचे मानले जाते. महापालिकेकडे सुमारे ३२ हजार व्यापारी व व्यावसायिकांची नोंद आहे. मागील आर्थिक वर्षात एलबीटी रद्द होण्याच्या अपेक्षेने सुमारे १६ हजार व्यापारी व व्यावसायिकांनी वार्षिक विवरणपत्रेच दाखल केलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेला सुमारे १४ हजार व्यापारी-व्यावसायिकांना दंडात्मक नोटिसा बजवाव्या लागल्या होत्या. त्यातील ९०० व्यापाऱ्यांची बॅँक खातीही सील करण्यात आली होती, तर मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्यांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर व्यापारी-व्यावसायिकांना ३१ डिसेंबरपर्यंत विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढही दिली होती. तरीही अनेक व्यापारी-व्यावसायिकांनी एलबीटी रद्द होण्याच्या अपेक्षेने विवरणपत्र दाखल केलेले नाही. आता राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्याने व्यापाऱ्यांकडून विवरणपत्र दाखल करण्याला प्रतिसाद मिळतो किंवा नाही, याबाबत पालिकेने धसका घेतला असून, विवरणपत्र दाखल करण्यास टाळाटाळ झाल्यास वसुलीसाठी पालिकेची धांदल उडण्याची शक्यता आहे. २९ जूनपर्यंत विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर १ आॅगस्टच्या आत म्हणजे केवळ महिनाभरात विवरणपत्र दाखल न करणाऱ्यांना पालिकेला १५ दिवसांच्या अंतराने दोनदा नोटिसा बजवाव्या लागणार आहेत. त्यासंबंधी कारवाई सुरू होत नाही तोच १ आॅगस्टपासून नवीन करपद्धती लागू होणार असल्याने जुन्या करपद्धतीबाबत वसुलीत अडथळे उत्पन्न होण्याची भीती पालिकेला आहे. त्यामुळेच महापालिकेने आतापासूनच वार्षिक विवरणपत्र मुदतीत दाखल करण्यासंबंधी व्यापारी व व्यावसायिकांना आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)