शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन कामकाजात गतिमानतेसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:19 IST

न्यायालयीन कामकाजामध्ये सुलभता, गतिमानता व गुणवत्तेसाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते़ अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी असतील तर कामाची गती व गुणवत्ता वाढून त्याचा फायदा न्यायाधीशांबरोबरच वकील व पक्षकारांनाही होतो़

नाशिक : न्यायालयीन कामकाजामध्ये सुलभता, गतिमानता व गुणवत्तेसाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते़ अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी असतील तर कामाची गती व गुणवत्ता वाढून त्याचा फायदा न्यायाधीशांबरोबरच वकील व पक्षकारांनाही होतो़ न्यायालयात कार्यरत विविध विभागांतील कामकाज व कायद्यातील दुरुस्ती याची सखोल माहिती कर्मचाºयांना मिळावी, यासाठी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी न्यायालयीन कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण सुरू केले आहे़ न्यायालयातील ४२५ कर्मचाºयांना जानेवारीपासून दर महिन्याच्या तिसºया शनिवारी हे प्रशिक्षण दिले जात असून, न्यायालयीन कामाची माहिती प्रबंधक व अनुभवी कर्मचारी तर कायद्यातील दुरुस्त्यांबाबत न्यायाधीश मार्गदर्शन करतात़  जिल्हा न्यायालयात प्रशासन, आस्थापना, संगणक, वित्त, बांधकाम, सांख्यिकी, मुद्देमाल, निरीक्षण, अभिलेखागार, ग्रंथालय अशा विविध ३० विभागांद्वारे काम सुरू असत्ंो़ न्यायालयात सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, लघुलिपिक, प्रमुख बेलिफ, बेलिफ, शिपाई काम करीत असून, या सर्व विभागांवर न्यायालयातील प्रबंधकांचे नियंत्रण असते़ न्यायालयीन कर्मचाºयांची आवश्यकतेनुसार विविध विभागात बदली तसेच नवीन कर्मचारी रुजू झाल्यानंतर त्यांना संबंधित विभागाच्या कामकाजाची माहिती नसल्यास कामामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, तसेच कामात गती व अचुकताही मिळत नाही़न्यायालयात न्यायाधीशांसोबत काम करणाºया कर्मचाºयांना सीआयएसमध्ये नोंद करणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, साक्ष नोंदविणे, समन्स, संगणकामध्ये नोंद या प्रकारची कामे करावी लागतात़ ही कामे करताना दिवाणी नियम पुस्तिका, फौजदारी प्रक्रिया संहिता, फौजदारी नियम पुस्तिका, महाराष्ट्र नागरी सेवा नियम यांची माहिती कायद्यातील बदलांची माहिती असणे गरजेचे असते़ न्यायालयातील कर्मचाºयांना विभागांची व बदलत्या कायद्यातील दुरुस्तींबाबत माहिती मिळावी त्यांच्यातील सॉफ्ट स्किल्स विकसित व्हावे यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रम प्रधान न्यायाधीश शिंदे यांनी सुरू केला आहे़सर्वांना प्रशिक्षण सक्तीचेन्यायाधीश व वकिलांना प्रशिक्षण मिळते त्याचप्रमाणे न्यायालयीन कर्मचाºयांनाही प्रशिक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहित शहा यांच्याकडे २०१५ मध्ये कोर्ट मॅनेजर अशोक दारके यांनी कल्पना मांडली होती़ त्यानुसार प्रशिक्षणाची रचना करून तात्पुरत्या स्वरूपात अंमलबजावणी करण्यात आली होती़ यामध्ये शिपाई व अत्यावश्यक कामातील कर्मचारी वगळता सर्वांना हे प्रशिक्षण सक्तीचे आहे़न्यायालयात येणºया नागरिकांना सौजन्यपूर्व वागणूक देणे गरजेचे आहे़ न्यायालयात येणारे पक्षकार, वकील यांच्यासोबत कसा व्यवहार करावा, याबरोबरच कर्मचाºयांचे कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने जानेवारीपासून प्रशिक्षण दिले जात आहे़ महिन्याच्या तिसºया शनिवारी दोन तास संबंधित विभागातील अनुभवी कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी तर कायद्यातील दुरुस्तींबाबत न्यायाधीश कर्मचाºयांना मार्गदर्शन करतात़ याबरोबरच कर्मचाºयांना त्यांचे कर्तव्य व जबाबदाºया, वेळेचे व्यवस्थापन, ताणतणाव व्यवस्थापन याचे प्रशिक्षण दिले जाते़- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिकadvocateवकिल