छगन भुजबळ : वरिष्य राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धेचे उद्घाटननाशिक : कधीकाळी हॉकी या क्रीडा प्रकारात भारताचे वर्चस्व होते. एवढेच नव्हे जगभरात दबदबा होता. आज तो राहिला नाही यांची खंत व्यक्त करीत येत्या काळात हॉकीला सुवर्ण दिवस आणायचे असतील खेळाडूंनी प्रयत्न केले पाहिजे. अनेक खेळाच्या स्वरुपात बदल होताहेत त्याप्रमाणे हॉकीतही बदल होऊन इनडोअर हॉकीचा येत्या काळात शालेय क्रीडाप्रकारात समावेश करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात आज ५व्या वरिष्ट गटाच्या राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, फुटबॉल-हॉकीसारखे खेळ जगभर खेळले जातात मात्र आपल्याकडे क्रिकेटला अधिक चांगले दिवस आहेत. इतरही खेळांचा आता विकास होतो आहे. काही वर्षांपूर्वी पाच दिवसांचा क्रिकेट सामना एका दिवसावर आणि आता २० षटकांवर आला आहे. त्याचप्रमाणे हॉकीही इनडोअर झाला आहे. येत्या काळात हाही खेळ शालेय स्तरापासून खेळताना दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत महाराष्ट्र शासनातर्फे खेळाडूंसाठी चांगल्या योजना आखल्याचे सांगितले. व्यासपीठावर नगरसेवक सचिन महाजन, हॉकी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, सुनील बागुल, छबु नागर, क्रीडा उपसंचालक जगन्नाथ अधाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, अशपाक शेख, नंदकिशोर खैरनार आदि उपस्थित होते. प्रास्ताविक अशपाक शेख यांनी केले. सदर स्पर्धेसाठी देशभरातून मुलांचे २८ तर मुलींचे १५ संघ सहभागी झाले आहेत.आज झालेल्या सामन्यात मुलांच्या महाराष्ट्र संघाने विजयी सुरुवात केली. छत्तीसगड संघाला ८/१ असा पराभव केला. स्पर्धेचा निकाल :मुले : दिल्लीने कोलकत्ताचा ४-२ असा पराभव केला. त्रिपूराने हिमाचल प्रदेशचा ७-१ असा पराभव केला. महाराष्ट्राने छत्तीसगडचा ८-१चा पराभव केला. उत्तराखंडने आसामचा १०-० असा पराभव केला. मुली : विदर्भ - मणीपूर यांच्यातील सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. हरियाणाने दादर नगरहवेलीचा १२-० असा पराभव केला. आसामने दिल्लीचा ७-४ असा पराभव केला.
शालेय खेळात इनडोअर हॉकीच्या समावेशासाठी प्रयत्नशील
By admin | Updated: May 31, 2014 00:47 IST