शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव तालुक्यात पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:39 IST

नांदगाव : चौकशी न करता आमच्या गावची वाहने सोडून देत जा. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा दम देत सायगाव (बगळी), ता. चाळीसगाव, जि. जळगाव या गावातील १५ ते २० जणांनी जिल्'ातील नांदगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या आमोदे या चेक पोस्ट मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दोघा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांत सायगावचा पोलीस पाटील असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

नांदगाव : चौकशी न करता आमच्या गावची वाहने सोडून देत जा. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा दम देत सायगाव (बगळी), ता. चाळीसगाव, जि. जळगाव या गावातील १५ ते २० जणांनी जिल्'ातील नांदगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या आमोदे या चेक पोस्ट मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दोघा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांत सायगावचा पोलीस पाटील असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.सदर घटना रविवारी घडली. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सायगाव या गावाकडून तीन मोटार सायकलीवरून काही लोक आले. त्यांना नांदगाव तालुक्यात म्हणजे नाशिक जिल्'ात प्रवेश करायचा असल्याने परंतु त्यांच्याकडे प्रवेशासंबंधी वैध स्वरूपाची कागदपत्रे नसल्याने चेक पोस्ट वरील पोलीस नाईक अनिल शेरेकर व शिपाई प्रदीप बागुल यांनी अडवून परत माघारी पाठवले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सायगाव कडून पुन्हा २० ते २५ लोक पायी चालत आले आणि त्यांनी डयूटीवरील पोलिसांना पुन्हा दम भरला. जिल्हा बंदी असल्याने आवश्यक कागदपत्रे असतील तरच सोडण्यात येऊ शकते असे पोलिस नाईक शेरकर यांनी त्यांना वारंवार समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्ध्या तासाने सायगाव बगळीचे पोलीस पाटील आबा शिंदे, गोकुळ मंडळ, युवराज शिंदे, धोंडीराम कुट्टीवाला यांचा मुलगा (नाव माहित नाही), दत्तू माळी, सुनील आहेर यांचा मुलगा (नाव माहित नाही) हे १० ते १५ जणांना घेऊन चेक पोस्ट वर आले. पोलीस पाटलाने वाहने चौकशी न करता सोडावीत असे दरडावले आणि दुपारी कोणी वाहने अडवली असे म्हणताच त्यांचे बरोबर असलेल्या सुनील आहेर यांच्या मुलाने शिपाई बागुल यांचा शर्ट फाडून व त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यानंतर गोकुळ मंडळ याने शेरेकर यांचाही शर्ट फाडून, यापुढे आमोदा चेक पोस्ट वर ड्यूटी कशी करतात ते बघतो, असा दम देत मारहाण केली. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-------------------कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रवेश बंदी असतानाही दमबाजी करत संबंधितांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधितांनी चेकपोस्ट वरील खुर्च्या व रस्त्यावर लावण्यात आलेले अडथळेही बाजूला फेकून दिले. दोघाही पोलिसांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर करत आहेत. दोघा पोलिसांना मारहाण झाली त्यावेळी त्यांच्यासमवेत दोन शिक्षकही तेथे उपस्थित होते. त्यांच्या समक्ष हा सगळा प्रकार घडला.

टॅग्स :Nashikनाशिक