शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस

By अझहर शेख | Updated: January 9, 2024 18:46 IST

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, पोलिस नाईक गोविंद भामरे करीत आहेत.

मनोज मालपाणी, नाशिकरोड : देवळाली गाव येथे पूर्व वैमनस्यातून आठ ते दहा जणांच्या सशस्त्र टोळक्याने एका बंद घराला लक्ष्य केले. दरवाजा तोडून घरातील सामानाची तोडफोड करत गल्लीत उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी अशा पंधरा वाहनांचे नुकसान करत दहशत माजविल्याची घटना सोमवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उपनगर पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

देवळाली गाव, तेलीगल्ली येथील सुनावाडा येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन-तीन युवक आबा पवार या युवकाची चौकशी करण्यासाठी आले होते. दरम्यान, आबा हा सुरतला लग्नासाठी गेलेला आहे. महिनाभरापूर्वी आबा व सुरज भालेराव यांच्यात वाद झाला होता. त्यावरून सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित सुरज भालेराव, अशरफ मणियार, साहिल नायर व त्यांचे तीन-चार साथीदार हे सुना वाड्यामध्ये दुचाकीवरून हातात कोयते, तलवारी, लोखंडी सळ्या घेऊन आले. त्यांनी आबाच्या नावाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्या माडीवरील बंद घराचा दरवाजा तोडून आतील सामानाची तोडफोड केली. टोळक्याने घरात नासधूस केल्यानंतर गल्लीत घराबाहेर उभी असलेली वाहने पिकअप (एमएच १५, ईजी २९३९), कार (एमएच १५, बीएक्स १०१९), ॲपेरिक्षा (एमएच १५, जेए ०१५६), कार (एमएच ०३, एआर ८८७३), रिक्षा (एमएच १५, ईएच ०१७२) या वाहनांच्या समोरील बाजूच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच ॲक्टिव्हा (एमएच १५, जेजे ६१२४/एमएच १५ एफएल ४६६५/एमएच १५ सीआर ७५५९), बजाज ( एमएच १५, एआर ०३७७), डिओ मोपेड (एमएच १५, जीझेड ९०६१), ज्युपिटर (एमएच १५ जेएन ८०५९), स्प्लेन्डर (एमएच १५, सीजे ६६०२/एमएच १५, एव्ही ४१६४/एमएच ४८ एएस १६९६), डिलक्स (एमएच १५, ईएन ४४२४) या दुचाकींवर तलवार, कोयते, लोखंडी सळ्यांनी प्रहार करून तोडफोड केली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, पोलिस नाईक गोविंद भामरे करीत आहेत. दुचाकीवरून समाजकंटक झाले फरार

आरडाओरड व शिवीगाळमुळे रहिवासी सचिन देशमुख, अशोक शिरोडे, बाळासाहेब जंगम, नियाज अली सय्यद, जगदीश वाघेले आदी रहिवासी घराबाहेर आले. रहिवासी घराबाहेर येऊन जमा होत असल्याचे बघत ते टोळके शिवीगाळ करत दहशत माजवत दुचाकीवरून पळून गेले. सदर घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अतिश सोन्याबापु जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर संशयितांचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Nashikनाशिक