शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या वडाळा पाथर्डी रस्त्यावरील दुभाजकांवर जाहिरातफलकांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:58 IST

कापडी, लोखंडी फलकांमुळे वाहतुकीस अडथळा

ठळक मुद्देकापडी, लोखंडी फलकांमुळे वाहतुकीस अडथळा

नाशिक- वडाळा पाथर्डी रस्त्यावरील दुभाजकांवर जागोजागी व्यावसायिकांच्या जाहिरात फलकांचे जाळे पसरलेले दिसत असून त्यामुळे रस्त्याची विद्रुपीकरण होत चालल्याने स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत आहे. या कापडी, लोखंडी फलकांमुळे वाहतुकीस अडथळा होत असून छोटे मोठे अपघातही होत आहेत. हे फलक तातडीने काढून घ्यावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.वडाळा नाका ते पाथर्डी गाव चौफुली हा वडाळा पाथर्डी रस्ता दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आला. दहा वर्षांपूर्वी वडाळा नाका ते राजसारथी सोसायटी या दरम्यान नागपूरच्या धर्तीवर रस्त्याचे रु ंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले तसेच रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात येऊन पादचाºयांसाठी दुतर्फा पदपथही तयार करण्यात आले.परंतु वडाळा नाका ते पाथर्डी गाव या वडाळा पाथर्डी रस्त्यादरम्यान असलेल्या दुभाजकावर काही व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे लोखंडी व कापडी फलक ठेवले आहे. त्यामुळे दुभाजक जाहिरात फलकासाठी की वाहनांच्या नियंत्रणासाठी आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.या रस्त्यादरम्यान विनय नगर साईनाथ नगर इंदिरानगर सार्थक नगर कलानगर पांडवनगरी यासह विविध उपनगरे असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या जाहिरात फलकांनी वाहतुकीस अडथळा होत आहे. कलानगर ते पाथर्डीगाव या दरम्यान रस्त्याचे काम झाले नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. याची दखल घेत सुमारे पाच वर्षांपूर्वी कलानगर ते पाथर्डीगाव रस्त्याचे रूंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच समोरासमोर वाहनांचे अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजकही टाकण्यात आले पादचाºयांसाठी दुतर्फा पदपथही तयार करण्यात आले आहे.