जळगाव नेऊर : गेल्या काही वर्षांपासून शेती हा व्यवसाय बेभरवशाचा ठरल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपूरक व्यवसायाबरोबरच आधुनिक महावस्त्र निर्मिती करण्यात परिसरातील तरुणांचे हात गुंतले आहेत. जगप्रसिद्ध पैठणी म्हटली की येवला नाव समोर येते, परंतु येवल्यात बनणारी पैठणी येवल्यात विकली जाते अन् जगभरही तिला मागणी आहे, परंतु येवल्यात तयार होणाऱ्या पैठणीचे कारागीर हे येवला व येवला परिसरातील आहेत. अशा वेळी आपल्या हाताने बनणारी पैठणी, तिच्या निर्मितीसाठी होणारा खर्च यांचे गणित येथील तरुणांना न जुळणे म्हणजे नवलच ! एकूणच कलाकुसर येते मग त्या कलेचा उपयोग केवळ कारागीर म्हणून न राहता उत्पादक व्हावे, उत्पादकावरच न थांबता विक्रेतेही व्हावे आणि केलेल्या कष्टातून अधिकचे चार रुपये आपल्याच पदरात पडावे या व्यवहारी हेतूने जळगाव नेऊर येथील कारागिरांनी, तरुणांनी हे सर्व कसब हेरले आहे व जळगाव नेऊर येथेच भव्य पैठणीचे दालन उभारले आणि तेथेच हातमागावर पैठणी तयार करण्याचे काम सुरू झाल्याने तरुणांना रोजगार निर्माण झाला. राज्यमार्गाच्या सोयीने आकर्षक शोरूम्स उभारून ग्राहकांना परवडेल अशा माफक दरात दर्जेदार माल, रास्त भाव असे सूत्र हाताळत पैठणी विक्र ीचे येवल्या खालोखाल दुसरे केंद्र म्हणून जळगाव नेऊर हे गाव नावारूपाला येऊ लागले आहे. सध्या जळगाव नेऊर या राज्यमार्गालगत शोरूममधून मोठ्या प्रमाणात राज्य व राज्याबाहेरील व परदेशातील ग्राहकदेखील पैठणी खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच या भागातील युवकांना कलाकुसरीचे प्रशिक्षण मिळत आहे. बहुतेक तरुणांनी कौशल्य विकसित केले आहे.
तरुणांसाठी जोडधंदा : ग्रामीण भागात मानाच्या महावस्त्राच्या निर्मितीला मदत परदेशी पर्यटकांना जळगाव नेऊरच्या पैठणीचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:12 IST
जळगाव नेऊर : गेल्या काही वर्षांपासून शेती हा व्यवसाय बेभरवशाचा ठरल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपूरक व्यवसायाबरोबरच आधुनिक महावस्त्र निर्मिती करण्यात परिसरातील तरुणांचे हात गुंतले आहेत.
तरुणांसाठी जोडधंदा : ग्रामीण भागात मानाच्या महावस्त्राच्या निर्मितीला मदत परदेशी पर्यटकांना जळगाव नेऊरच्या पैठणीचे आकर्षण
ठळक मुद्देपैठणी येवल्यात विकली जाते अन् जगभरही तिला मागणी आहेजळगाव नेऊर येथेच भव्य पैठणीचे दालन उभारले