नाशिक : जेलरोड परिसरातील एका अल्पवयीन मुलीस जिवे ठार मारण्याची धमकी देऊन महिनाभरापासून अत्याचार सुरू असल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित प्रवीण प्रकाश किरवे (२२, रा़ जेलरोड) विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़जेलरोड परिसरात कुटुंबीयांसह राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस संशयित किरवे याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ तसेच या मुलीवर जुलै व आॅगस्ट २०१६ या कालावधीत विविध ठिकाणी नेऊन शारीरिक अत्याचार केला़ पीडित मुलीने आपल्या आईला याबाबत सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने उपनगर पोलीस ठाणे गाठून रितसर फिर्याद दिली़ या प्रकरणी संशयित किरवेविरोधात उपनगर पोलिसांनी बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल
By admin | Updated: September 2, 2016 23:10 IST