सिन्नर : तालुक्यातल्या चापडगाव आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने वेळोवेळी अत्याचार केल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्याने दिली आहे. याप्रकरणी आश्रमशाळेचा मुख्याध्यापक संशयित आरोपी सुरेश सुपडू कापडणीस याच्याविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चापडगाव येथील आश्रमशाळेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीहून संशयित सुरेश सुपडू कापडणीस याच्याविरोधात वावी पोलीस ठाण्यात बलात्कार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
मुख्याध्यापकाचा महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार
By admin | Updated: January 5, 2017 01:40 IST