शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे एटीएम, बँकांमध्येही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:02 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर नाशिक शहरातील सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी अधिक वाढविली असून, रस्त्यावर कामाशिवाय उतरणाऱ्या नागरिकांना कर्तव्यावर असलेले कर्मचारी पोलिसी खाक्या दाखवत असल्याने शहरातील आर्थिक नस बनलेल्या बँका आणि एटीएममध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.

ठळक मुद्देमोबाइल अ‍ॅपचा वापर : संसर्ग टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना पसंती

नाशिक : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर नाशिक शहरातील सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी अधिक वाढविली असून, रस्त्यावर कामाशिवाय उतरणाऱ्या नागरिकांना कर्तव्यावर असलेले कर्मचारी पोलिसी खाक्या दाखवत असल्याने शहरातील आर्थिक नस बनलेल्या बँका आणि एटीएममध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.कोरोनाच्या प्रभावामुळे शहरात असलेला पोलिसांचा बंदोबस्त आणि सोशल मीडियावर पोलिसांकडून नागरिकांना होणाºया मारहाणीचे व्हिडीओ यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण असून, सामान्य नागरिक बँका अथवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठीही घराबाहेर पडताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे एटीएम मशीनच्या माध्यमातून संसर्ग होण्याची भीतीही नागरिकांमध्ये असल्याने अनेकजण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, आॅनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. देशात ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर रोख स्वरूपात चलन टंचाई निर्माण झाल्याने अचानक मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार वाढले होते. त्यानंतर बाजारात चलन प्रवाह सुरळीत झाल्यानंतर हे प्रमाण सामान्य झाले होते. यात पुन्हा वाढ झाली आहे.शहरात कोणतीही आपत्ती असली तरी सुरुवातीला हाताशी काही पैसे असावे म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून एटीएम, बँकांमधून पैसे काढण्याची लगबग सुरू होते. परंतु, देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतरही नागरिकांकडून एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे.पैसे काढण्यासाठी नेहमी ग्राहकांची गर्दी होणाºया शहरातील मध्यवर्ती भागातील एटीएममध्येही सध्या शुकशुकाट असून, कोणाकडूनही थेट नोटांच्या स्वरूपात रोख रक्कम घेण्याऐवजी मोबाइल अ‍ॅपचा वापर करणाºया ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना अनेक नागरिकांनी स्वत:हून एटीएममधून पैसे काढणे टाळण्यास सुरुवात केली आहे. एटीएममध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी येणाºया-जाणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, प्रत्येकाचा स्पर्श मशीनला होत असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेकजण एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करणे टाळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक