शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदत्त नगरमधील किराणा दुकानसह एटीएम सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:45 IST

सिन्नर : शहरातील सरदवाडी रोडवरील गुरुदत्त नगरमध्ये कोरोना बाधित आढळल्यानंतर रुग्णाचे घर केंद्र मानून परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषीत करण्यात येते. या नियमाला धरुन गुरुदत्तनगरमधील कानिफनाथ किराणा दुकान नगर परिषदेकडून पुढील आदेश येईपर्यंत सिल करण्यात आले आहे.

सिन्नर : शहरातील सरदवाडी रोडवरील गुरुदत्त नगरमध्ये कोरोना बाधित आढळल्यानंतर रुग्णाचे घर केंद्र मानून परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषीत करण्यात येते. या नियमाला धरुन गुरुदत्तनगरमधील कानिफनाथ किराणा दुकान नगर परिषदेकडून पुढील आदेश येईपर्यंत सिल करण्यात आले आहे. या दुकानाशेजारी असणारे ए.टी.एम केंद्रही बंद ठेवण्याचा आदेश प्रतिबंधीत क्षेत्राचे अधिकारी अर्जुन भोळे यांनी दिला आहे.कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून त्यात अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार असा रुग्ण आढळल्यास रुग्णाचे घर केंद्रबिंदू घोषीत करून त्यापासून ५० मीटरचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र व एक किमीचा परिसर बफरझोन घोषीत करण्यात येतो.गुरुदत्तनगरमध्ये रुग्ण आढळल्यानंतरही कानिफनाथ किराणा दुकान सुरु होते. त्यामुळे परिसरात विनाकारण गर्दी केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही गर्दी टाळण्यासाठी कानिफनाथ किराणा दुकान १३ जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत सिल करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. याच ठिकाणी असलेले ए. टी. एम. उघडू नये अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अंतर्गत पुढील कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा या आदेशात देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक