शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:12 IST

मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देमध्यरात्री एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला मध्यरात्री एटीएममध्ये एका युवकाच्या संशयास्पद हालचाली एटीएम केंद्राजवळ जात शटर खाली ओढले

नाशिक : नोकरीच्या शोधात उत्तरप्रदेश राज्यातून शहरात भटकंती करत गोदाकाठावर वास्तव्य करणाऱ्या एका तरूण परप्रांतीय चोरट्याने रविवारकारंजा येथील पंजाब नॅशनल बॅँकेच्या एटीएम केंद्रात जाऊन सोमवारी (दि.१८) मध्यरात्री एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र गस्तीवर असलेल्या बीट मार्शल पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ संशयित सनी रावत (१९) यास बेड्या ठोकल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली. यामुळे यंत्राचा पत्रा कापला केलो; परंतू आतमध्ये असलेल्या रोकडच्या ट्रेपर्यंत त्याला पोहचता आले नाही.

दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या रात्रपाळीच्या गस्तीवर असलेले बीट मार्शल भगवान गवळी व त्यांच्यासोबत असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाच्या मध्यरात्री एटीएममध्ये एका युवकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ दुचाकी थांबवून एटीएम केंद्राजवळ जात शटर खाली ओढले. यामुळे संशयित सनी गाळ्यात अडकला. पोलिसांनी तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवरून पोलीस ठाण्याला माहिती देत अतिरिक्त पोलिसांची मदत बोलावून घेतली. पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केंद्राच्या परिसरात क डे केले आणि वाहने उभी करून रस्ता रोखला. यावेळी शटर पुन्हा वर करत सनीला तत्काळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरात पुन्हा एटीएम यंत्राची लूटीचा प्रयत्न फसला; मात्र एटीएम सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक धर्मेश पवार करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीatmएटीएम