शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकमुक्तीसाठी जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:21 IST

सध्याच्या काळात प्लॅस्टिकचा वापर प्रचंड वाढला असून, त्यामुळे होणाºया प्रदूषणाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न निफाड येथील वैनतेय विद्यालयाने हाती घेऊन शुक्रवारच्या बाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असे दुकानदारांना आवाहन करीत जनजागरण केले.न्यायमूर्ती रानडे महोत्सवांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

निफाड : सध्याच्या काळात प्लॅस्टिकचा वापर प्रचंड वाढला असून, त्यामुळे होणाºया प्रदूषणाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न निफाड येथील वैनतेय विद्यालयाने हाती घेऊन शुक्रवारच्या बाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असे दुकानदारांना आवाहन करीत जनजागरण केले.न्यायमूर्ती रानडे महोत्सवांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.  गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी, प्राचार्य मालती वाघवकर यांना वैनतेय विद्यालयात कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांकडून कापडी पिशव्या बनवा आणि या बनवलेल्या पिशव्यांचे विद्यार्थ्यांकडून वाटप करून त्यांना त्या वापरण्यासाठी प्रवृत्त करा. शिवाय आठवडे बाजारात दुकानदारांनासुद्धा या कापडी पिशव्या भेट देऊन प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्यासाठी विनंती करा, अशी सूचना केली. जगताप यांची ही विनंती त्यांनी तत्काळ मान्य केली व हा उपक्रम राबविण्यासाठी कार्यवाही केली.  वाघवकर यांनी कार्यानुभव या विषयांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या बनवून आणण्यासाठी सांगितले. उपप्राचार्य रेखा चौधरी, पर्यवेक्षक डी. बी. वाघ, पर्यवेक्षक तानाजी दराडे यांनी व कार्यानुभव शिक्षकांनी हा उपक्र म विद्यार्थ्यांकडून राबविला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत जवळजवळ दोन हजार कापडी पिशव्या बनवून आणल्या. विद्यालयाने या पिशव्या घेऊन आठवडे बाजारात या प्रश्नावर जनजागरण करत प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका या अभियानास प्रारंभ झाला.  या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, वि. दा. व्यवहारे यांची भाषणे झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी रॅली काढली. या रॅलीत ‘प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, प्लॅस्टिकचे प्रदूषण थांबवा, माणसा..माणसा.. एकच कर प्लॅस्टिक पिशव्यांना देऊ नको घर, माणसा.. माणसा.. एकच विनंती, प्लॅस्टिक पिशव्यांना देऊ नको पसंती, कचºयाच्या ढिगाºयात दडलंय काय, प्लॅस्टिकशिवाय दुसरं काय’ यांसह अनेक घोषणा लिहिलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. विद्यार्थ्यांनी या घोषणा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.या उपक्रमास न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, विश्वस्त आप्पासाहेब उगावकर, वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, प्रभाकर कुयटे, राजेंद्र राठी, किरण कापसे, दिलीप वाघवकर, राजेश सोनी, मधुकर राऊत उपस्थित होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSchoolशाळा