शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:18 IST

नाशिक : शहर आणि तालुक्याचा परिसर मुख्यत्वे पश्चिम वनविभाच्या अखत्यारितीत येतो. दारणाकाठावर सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. पश्चिम वनविभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी अन्य शहरांमधून पिंजऱ्यांची जमवाजमव केली असली तरी पुरेशी साधनसामुग्रीच्या अभावामुळे प्रत्यक्षरीत्या घटनास्थळावर वनअधिकारी व कर्मचाºयांची तारांबळ उडून दमछाक होत आहे.

ठळक मुद्देपश्चिम वनविभाग : विहिरीतील वन्यजीव ‘रेस्क्यू’ करताना तारांबळ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहर आणि तालुक्याचा परिसर मुख्यत्वे पश्चिम वनविभाच्या अखत्यारितीत येतो. दारणाकाठावर सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. पश्चिम वनविभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी अन्य शहरांमधून पिंजऱ्यांची जमवाजमव केली असली तरी पुरेशी साधनसामुग्रीच्या अभावामुळे प्रत्यक्षरीत्या घटनास्थळावर वनअधिकारी व कर्मचाºयांची तारांबळ उडून दमछाक होत आहे.पश्चिम वनविभागाकडे बिबट्यासारख्या वन्यजिवांच्या रेस्क्यूकरिता साधनसामुग्री नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. चाडेगाव शिवारात आठवड्यापूर्वी धोकादायक विहिरीत पडलेला बिबट्या रेस्क्यू करण्याचे आव्हान कौशल्यपूर्ण पद्धतीने अपुºया व अयोग्य साधनसामुग्रीच्या बळावर वन अधिकारी व कर्मचाºयांनी लिलयापणे पेलले; मात्र यावेळी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यास स्वत:लाही सुरक्षित ठेवताना मोठी कसरत कर्मचाºयांना करावी लागली. वनविभागाकडे विहिरीत कोसळलेले वन्यजीव बाहेर काढण्यासाठी कमी वजनाचा लहान पिंजराच अद्याप उपलब्ध नाही. यामुळे मोठा जड पिंजरा कर्मचाºयांना वापरात आणावा लागतो. औषधोपचार पिंजºयाअभावी हेळसांडपश्चिम वनविभागाच्या हद्दीत बिबटे, वानर, तरस, हरीण, माकड, गिधाड यांसारख्या वन्यजिवांचा वावर अधिक आहे. हद्दीतून राष्टÑीय व राज्य महामार्ग, रेल्वेमार्ग जात असल्यामुळे अनेकदा अपघातात वन्यजीव मृत्युमुखी पडतात, जखमी होतात. अशावेळी या वन्यजिवांच्या जखमांचा दाह थांबविताना औषधोपचार करणेदेखील मोठे ‘दिव्य’ ठरते. कारण वनविभागाकडे त्या पद्धतीची रचना असलेला विशिष्ट ‘औषधोपचार पिंजरा’च उपलब्ध नाही. अद्ययावत सामुग्रीची उणीवबिबट्यासारख्या वन्यजिवाला भुलीचे औषध देण्यासाठी वापरली जाणारी नाशिक परिक्षेत्राची ‘ट्रॅन्क्युलाइज गन’देखील नादुरुस्त झाली आहे. तसेच पश्चिम वनविभागातील आठ वनपरिक्षेत्र आणि त्यांचे मिळून ३५ ते ३८ वनपरिमंडळ आहेत. एवढे मोठे क्षेत्र असताना केवळ नाशिक, सिन्नर या दोन परिक्षेत्रांकडेच स्वतंत्र ‘ट्रॅन्क्युलाइज गन’ आहे. गस्तीसाठी वाहनेही अपुरी आहेत. प्रत्येक परिक्षेत्राकरिता केवळ एक गस्तीवाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे कर्मचाºयांना गस्त करताना तारेवरची कसरत करावी लागते.

टॅग्स :agricultureशेतीforestजंगल