शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शहीद गोसावी कुटुंबियांना सिन्नर पंचायत समितीकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:40 IST

सिन्नर : शहीद जवान नायक केशव गोसावी यांचे कुटुंबियांना सिन्नर पंचायत समिती, सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियन व नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने तातडीची आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली.

सिन्नर : शहीद जवान नायक केशव गोसावी यांचे कुटुंबियांना सिन्नर पंचायत समिती, सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियन व नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने तातडीची आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली.सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील सैन्य दलाच्या २४ मराठा बटालीयनमधे नेमणुकीवर असलेले जवान नायक केशव गोसावी हे रविवार दि. ११ रोजी जम्मु काश्मीर नौशेरा भागात पाकच्या हल्ल्यात शहीद झाले. त्यांचे कुटुंबिय व संपुर्ण शिंदेवाडी गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्या दु:खातुन सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशा शब्दात आदरांजली पंचायत समितीच्या वतीने वाहण्यात आली.शहीद जवानाचे पश्चात अपंग वडील, पत्नी व विवाहीत बहीण असा परिवार आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने रोख रक्कम २५ हजार रुपये आर्थिक मदत आज शहीद जवानाचे वडील सोमगीर गोसावी यांचेकडे सुपुर्द केली. सिन्नर पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने रोख ३१ हजार रुपये आर्थिक मदत शहीद जवानाचे वडीलांकडे सुपुर्द केली.तसेच नाशिक जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे वतीने शहीद जवानाचे कुटुंबियांस दिली जाणाऱ्या आर्थिक मदत म्हणून २१ हजार रुपयांचा धनादेश विर पत्नी यशोदा केशव गोसावी यांच्या नावाने सुपुर्द करण्यात आला.यावेळी सिन्नर पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, गटनेते विजय गडाख, गटविकास आधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ, बालविकास प्रकल्प अधिकारी गोरख शेवाळे, नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, कृषी अधिकारी कैलास भदाणे, पशुधन विकास अधिकारी डॉ.मिलींद भणगे, लेखाधिकारी विजय आघाव, ग्रामसेवक युनियन तालुका सचिव जालींदर वाडगे, सहसचिव प्रमोद शिरोळे, संघटक संदीप देवरे, विस्तार अधिकारी संजय मोरे, शिंदेवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई हांडोरे, उपसरपंच दत्तु खाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक