रोजगार नसल्याने आसऱ्यासाठी आलेल्या परप्रांतीय कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:15 PM2020-04-08T23:15:25+5:302020-04-08T23:15:56+5:30

कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने संपूर्ण जगासह देशात थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला आसल्यामुळे अनेक परप्रांतीय कामगारा स्थलांतराचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे थांबविण्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांच्या कुटुंबीयांसाठी विविध जीवनावश्यक वस्तूंसहित भाजीपाल्याची मदत तहसील प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येत आहे.

Assistance to the families of the refugees who came to the area without jobs | रोजगार नसल्याने आसऱ्यासाठी आलेल्या परप्रांतीय कुटुंबीयांना मदत

पिंप्री सदो येथे असलेल्या परप्रांतीय नागरिकांसाठी भाजीपाला तसेच धान्य मदत तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे सुपूर्द करताना शिवाजी गाढवे, सुनील गाढवे आदी.

Next

नांदूरवैद्य : कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने संपूर्ण जगासह देशात थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला आसल्यामुळे अनेक परप्रांतीय कामगारा स्थलांतराचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे थांबविण्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांच्या कुटुंबीयांसाठी विविध जीवनावश्यक वस्तूंसहित भाजीपाल्याची मदत तहसील प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सगळेच व्यावहार, व्यवसाय, छोटे-मोठे उद्योगधंदे बंद केले असल्याने परराज्यातील कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतांना आठ दिवसांपूर्वी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर तसेच तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सदर परप्रांतीय नागरिकांना पिंप्री सदो जवळील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी या शाळेत त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने या नागरिकांसाठी ‘एक हात मदतीचा’ या उपक्र मांतर्गत गाडी भरून विविध प्रकारचा भाजीपाला तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच इगतपुरी जवळच असलेल्या सेंट्रल हॉल गुरुद्वार यांच्या वतीने या नागरिकांना दोन वेळचे जेवण तसेच दोन वेळेचा चहाची व्यवस्था केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या ठिकाणी इगतपुरी प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागाचे पथक तसेच पोलिस बंदोबस्तात काळजी घेतली जात असल्याचे तहसीलदार पागिरे यांनी सांगितले.
याप्रसंगी मदत धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे, सदस्य अशोक गाढवे, सुनील गाढवे, नामदेव घुमरे, भरवीरचे सरपंच नवनाथ झनकर, गुरुद्वारचे सेवादार सुकदेवसिंग, स्वप्निल भंडागे, प्रकाश पारख, सोमनाथ बरतड, बापू झनकर आदी उपस्थित होते.

Web Title: Assistance to the families of the refugees who came to the area without jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.