शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:50 IST

सिडको : येथील गणेश चौकात चार युवकांच्या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून एका युवकास धारदार शस्त्राने तलवारीने वार करत लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

सिडको : येथील गणेश चौकात चार युवकांच्या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून एका युवकास धारदार शस्त्राने तलवारीने वार करत लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या चौघांना गुरुवारी पाथर्डी परिसरात शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संतोष उर्फ भूषण देवरे (२६, रा. गणेश चौक, सिडको) याने संशयित आकाश वानखेडे, सोनू सोनार, सचिन राठोड व तुषार निंबाळकर यांचे एक भांडण सोडविले होते. याचा राग मनात धरून सदर चारही संशयितांनी तलवारसारख्या हत्याराचा वापर करून संतोष उर्फ भूषण देवरे यास घरात जाऊन तलवारीने वार करून दांडक्याने मारहाण करून जखमी केले.शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, युवराज पाटील, यांना मिळालेल्या माहितीवरून पाथर्डी- वडनेर रस्त्यावर दर्गाजवळ संशयित आरोपी असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून चारही संशयितांना ताब्यात घेतले आहे व त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. अंबड पोलिसांनी चारही संशयित आरोपी आकाश वानखेडे ( २६,रा. पाथर्डी), सोनू सोनार (२०, रा. स्वामी विवेकानंदनगर, सचिन राठोड ( २२) व तुषार निंबाळकर ( २३, रा. राजीवनगर) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.--------घटनेनंतर जखमी संतोष यास उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महेश देवरे याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेनंतर चारही संशयित फरार झाले होते. यानंतर अंबड पोलिसांसमवेत गुन्हे शाखेचे विभागाने तपास सुरू केला.

टॅग्स :Nashikनाशिक