शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्षाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 17:15 IST

संशयित पोलिसात हजर : आर्थिक वादाचा संशय

ठळक मुद्दे संशयित आरोपी गोंदके स्वत:हून पोलिसांत हजर

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची बुधवारी (दि.२१) त्यांच्याच घराजवळ राहणाऱ्या १८ वर्षीय युवकाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी स्वत:हून पोलिसात हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आठ महिन्यांच्या काळात तुंगार कुटुंबावर हा तिसरा आघात असल्याने त्र्यंबकेश्वरी हळहळ व्यक्त केली जात आहे.धनंजय तुंगार हे त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांचे चिरंजीव होत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२१) तुंगार यांच्या घरी धनंजय यांचे मोठे बंधू शेखर तुंगार यांच्या बाराव्याचा श्राद्ध विधी सुरू होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय तुंगार हे अहल्या धरणाकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असताना त्यांच्याच घराजवळ राहणा-या समीर गोंदके (वय १८) याने तुंगार यांच्यावर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी होऊन धनंजय तुंगार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित आरोपी गोंदके स्वत:हून पोलिसांत हजर झाला. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेने त्र्यंबकेश्वर शहरात खळबळ उडाली आहे.कुटुंबावर तिसरा आघातत्र्यंबकेश्वरच्या जडणघडणीत तुंगार कुुटुंबीयांचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषविलेले यादवराव तुंगार यांचे याचवर्षी मार्चमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले तर त्यापाठोपाठ यादवराव यांचे ज्येष्ठ पुत्र शेखर ऊर्फ शिवाजीराव यांचे १० आॅक्टोबरला निधन झाले. त्यांच्या निधनाला १२ दिवस उलटत नाही तोच बुधवारी धनंजय तुंगार यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तुंगार कुटुंबावर आठ महिन्यांच्या काळात हा तिसरा आघात आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकMurderखून