शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांसाठी दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 01:00 IST

नांदूरशिंगोटे : परिसरातील २० ते २५ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, नामनिर्देशन पत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

ठळक मुद्देउमेदवारांची चाचपणी : गावागावात कोपरा बैठकांना प्रारंभ

नांदूरशिंगोटे : परिसरातील २० ते २५ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, नामनिर्देशन पत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

             अर्ज दाखल करताना १५ ते १६ कागदपत्रांची पूर्तता लागणार असल्याने पहिल्या दिवशी त्यासाठी धडपड सुरू होती. नांदूरशिंगोटे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने परिसरातील गावांचा दररोज येथे राबता असतो. भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, दापूर, चापडगाव, धुळवड, शिवाजीनगर, दत्तनगर, गोंदे, खंबाळे, दातली, सुरेगाव, मऱ्हळ बुद्रुक, मऱ्हळ खुर्द, निऱ्हाळे, मानोरी, कणकोरी आदी ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली असून, गावातील दोन्हीही गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, तर इच्छुक उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.

इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करताना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे बंधनकारक असल्याने नांदूरशिंगोटे येथील बँकेत इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली. परिसरातील ग्रामपंचायतीत विविध दाखले जमा करण्यासाठी तसेच थकीत करभरणा करण्यासाठी गर्दी झाली होती. गावपातळीवरील गटावर तसेच वाड्यावाईज कोपरा बैठकांना प्रारंभ झाला आहे. या वेळेस निवडणूक लढविण्यासाठी तरुण प्रयत्नशील आहेत.पॅनल निर्मितीचा प्रश्नग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने गावोगावी तयारी सुरू झाली आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने पॅनल निर्मिती कोणी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक आवेदन पत्र, अनामत रक्कम, ग्रामपंचायतीची थकबाकी, प्रचार यंत्रणा आदी खर्चिक बाबी सरपंचपदासाठी दावेदार असलेली व्यक्ती सांभाळायची. त्यामुळे सेनापतीच घोषित नसल्याने पॅनलचा खर्च कोणी सांभाळायचा हा प्रश्न गाव पुढाऱ्यांपुढे उभा राहिला आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक