शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र न दिलेल्यांची माहिती मागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:32 IST

राखीव जागेवर निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आता जिल्ह्यातील ३०३२ इतक्या सदस्यांची सविस्तर माहिती ग्रामपंचायत विभागाने मागविली असून, त्यात सदस्याने नामांकन दाखल करण्यापासून ते निवडून येण्यापर्यंतच्या माहितीचा समावेश आहे.

नाशिक : राखीव जागेवर निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आता जिल्ह्यातील ३०३२ इतक्या सदस्यांची सविस्तर माहिती ग्रामपंचायत विभागाने मागविली असून, त्यात सदस्याने नामांकन दाखल करण्यापासून ते निवडून येण्यापर्यंतच्या माहितीचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशावर राज्य सरकारला कार्यवाही करावयाची असल्याने यंत्रणेला शासनाच्या आदेशाची प्रतिक्षा आहे.  सर्वोेच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक आयोगाने सदरची पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. निवडणूक कायद्यान्वये राखीव जागांवर निवडणूक लढविणाºया सदस्यांनी सहा महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचे सदस्य रद्द करण्याची तरतूद आहे.  या तरतुदीला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यामुळे सदस्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु न्यायालयाने याचिकेला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणाºयांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आयोगाने सर्व राज्य सरकारकडून अशा सदस्यांची माहिती मागविली होती. त्यानुसार नाशिक जिल्हयात तीन जिल्हा परिषद सदस्य, दहा पंचायत समिती सदस्य व ३०१९ ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीत जात प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे उघडकीस आले आहे.सदस्यांना नोटिसा बजावणारजिल्हापातळीवर तालुक्यांनी फक्त संख्या कळविली असून, आता सदस्यांची संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे. त्या माहितीची पडताळणी केल्यानंतर सदस्यांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. परंतु या संदर्भात राज्य सरकारचे अद्याप कोणतेही आदेश स्थानिक पातळीवर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे तूर्त माहिती मागवून तिची खातरजमा करण्यावर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत