शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गटासाठी  अतिरिक्त निधी मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 01:01 IST

बांधकाम विभागाने दिलेल्या अतिरिक्त प्रशासकीय मान्यतेमुळे आदिवासी गटात विकासकामांसाठी निधी मिळणार नसल्याचे पाहून घालमेल वाढलेल्या आदिवासी सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरच्या अतिरिक्त प्रशासकीय मान्यता रद्द कराव्यात अथवा आदिवासी गटात कामांसाठी शासनाकडून अतिरिक्त निधीची सोय करण्याची मागणी केली. त्यावर शासनाकडून अतिरिक्त निधी मागविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. 

ठळक मुद्देजि.प. प्रशासनाचे आश्वासन : शासनाला पत्र देणार

नाशिक : बांधकाम विभागाने दिलेल्या अतिरिक्त प्रशासकीय मान्यतेमुळे आदिवासी गटात विकासकामांसाठी निधी मिळणार नसल्याचे पाहून घालमेल वाढलेल्या आदिवासी सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरच्या अतिरिक्त प्रशासकीय मान्यता रद्द कराव्यात अथवा आदिवासी गटात कामांसाठी शासनाकडून अतिरिक्त निधीची सोय करण्याची मागणी केली. त्यावर शासनाकडून अतिरिक्त निधी मागविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. जिल्हा परिषदेला दरवर्षी मिळणाऱ्या विकासकामांच्या निधीतून त्यात्या खात्याकडून नियोजन केले जात असले तरी, बांधकाम विभाग-१ ने मंजूर निधीपेक्षाही अधिक रकमेच्या अतिरिक्त कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. त्यामुळे या अतिरिक्त कामांमुळे पुढच्या वर्षी आदिवासी गटात रस्त्यांची कामे करण्यासाठी निधी शिल्लक राहणार नसल्याची बाब लक्षात आली आहे. त्यामुळे आदिवासी सदस्य संतप्त झाले असून, त्यांनी या अतिरिक्त प्रशासकीय मान्यता रद्द करण्याबरोबरच आदिवासी गटांसाठी जादा निधी देण्याची मागणी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष सयाजी गायकवाड यांच्याकडे केली होती. सदस्यांमध्ये तीव्र नाराजीअधिकारी-ठेकेदारांच्या संगनमताने सदरचा प्रकार घडल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने आदिवासी गटातील कामांसाठी जिल्हा नियोजन विकास मंडळातून निधी मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, सदस्य भास्कर गावित, विनायक माळेकर आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेतली व सारा प्रकार कथन केला. अतिरिक्त प्रशासकीय मान्यतेमुळे आदिवासी गटांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून त्यासाठी शासनाकडून अतिरिक्त निधीची मागणी करण्याची विनंती त्यांनी केली. त्यावर बनसोड यांनी या संदर्भात शासनाला पत्र पाठविण्याची तयारी दर्शविली. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदMONEYपैसा