शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

आशियाचे ब्लू समोराई ढेपाळले, तर आफ्रिकन एलिफंट्स आणि अझ्झुरीची आगेकूच

By admin | Updated: June 16, 2014 01:06 IST

आशियाचे ब्लू समोराई ढेपाळले, तर आफ्रिकन एलिफंट्स आणि अझ्झुरीची आगेकूच

आनंद खरेफिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशी जसा नेदरलॅँडने गतविजेत्या स्पेनला दिलेला झटका बघायला मिळाला तसा तिसऱ्या दिवशीही कोस्टारिकाने उरुग्वेला अस्मान दाखवून या स्पर्धेतील दुसरा झटका दिला. ‘ड’ हा गट या स्पर्धेतील ग्रुप आॅफ डेथ मानला गेला आहे आणि यामधून इटली, उरुग्वे आणि इंग्लंड या तीन संघांपैकी कोणते दोन संघ पुढे जातील आणि या तीनपैकी कोणत्या संघाला या ग्रुप आॅफ डेथमध्ये समावेश झाल्यामुळे साखळीतच मरण पत्करावे लागले याचीच चर्चा होत होती. यामध्ये या गटातील चौथा संघ कोस्टारिका याची फारशी चर्चा केली जात नव्हती. मात्र आपल्या पहिल्याच सामन्यात कोस्टारिकाने नेदरलॅँडचा कित्ता गिरवत भरवशाच्या उरुग्वे संघाला अस्मानच दाखवले. या सामन्यात दोघांचाही पूर्वइतिहास बघता उरुग्वेच विजयी होईल असेच वाटत होते (त्यामुळे या सामन्याऐवजी या गटातील इटली-इंग्लंड या सामन्याकडेच सर्वांचे लक्ष होते) कारण उरुग्वे-कोस्टारिका या दोन्हीही संघांचा विचार केल्यास दोन विश्वविजेतेपद पाठीशी असणाऱ्या उरुग्वेने आत्तापर्यंत १५ वेळा विश्वचषकाच्या स्पर्धेत स्थान मिळविले आहे. गेल्या २०१० च्या विश्वचषकात उरुग्वेची कामगिरीही चौथ्या क्रमांकाची होती. या पार्श्वभूमीवर कोस्टारिकाने केवळ चार वेळा विश्वचषकाची वारी केली आहे आणि या चारही वेळा वारकरी म्हणूनच त्यांचा सहभाग दिसून आला. या चारपैकी केवळ एकदाच कोस्टारिकाला गटवार साखळीचा अडथळा दूर करून १६ मध्ये स्थान मिळविता आले आहे. १६च्या पुढे त्याला मजला मारता आली नाही. गत विश्वचषकासाठी तर कोस्टारिकाला आपली पात्रताही सिद्ध करता आली नव्हती. या सर्वांचा विचार करता उरुग्वेच बाजी मारेल असाच अंदाज वर्तवला जात होता. उरुग्वेने सुरुवातही त्याच जोमात केली आणि २२ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे अनुभवी कव्हानीने गोलात रुपांतरही केले. उत्तरार्धात मात्र नव्या एनर्जीने मैदानात उतरलेल्या कोस्टारिकाच्या आघाडीच्या टुनी एकदम आक्रमक पवित्रा घेतला आणि ५२व्या मिनिटाला जोएल कॅम्पबेलने गोल करून बरोबरी साधली तर लगेचच या उत्तर अमेरिकन संघाने दोनच मिनिटांनी दुसऱ्या हल्ल्यात आॅस्कर डर्टेने गोल करत जणू आॅस्करच मिळवून दिले. उरुग्वेच्या फलॉन, सुआरेस, कव्हानी या दिग्गजांनी बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र त्याला कोस्टारिकाच्या शिलेदारांनी दाद लागू दिली नाही. उलट आपला टेम्पो कायम राखत शेवटी मार्को युरेनाद्वारा आणखी एक गोल लगावून विजयाची निश्चिती केली. त्यानंतर सुरू झाला इटली-इंग्लंड हा दुसरा एक हाय प्रोफाईल सामना. चारवेळा विश्वविजेता असलेल्या इटलीला गज विश्वचषकात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. इटलीला गेल्या विश्वचषकात आपल्या गटात एकही संघ त्याच्याइतका दर्जेदार नसतानाही स्लोव्हेनियासारख्या संघाकडून हार पत्करावी लागली होती, तर न्यूझीलंड आणि पेराग्वे या कधीतरी विश्वचषकामध्ये स्थान मिळविणाऱ्या संघांकडून बरोबरीत समाधान मानावे लागले होते. (हे तीनही संघ यावेळी पात्र ठरले नाहीत) म्हणजेच एकही विजय न मिळवता इटली गटात शेवटच्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र त्यानंतर झालेल्या २०१२ च्या युरो चषकात अंतिम फेरी गाठून इटलीने संघाची झालेली पडझड सावरली आहे, तर इंग्लंड विश्वचषकात नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. मात्र १९६६ चे विजेतेपद वगळता इंग्लंडला फारशी वरची कामगिरी करता आलेली नाही. गेल्या २०१२ च्या युरो चषकात याच दोन संघांत झालेल्या उपउपांत्य सामन्यात बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने बाजी मारली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा या विश्वचषकात पहिल्याच सामन्यात आमनेसामने आलेल्या या संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. मात्र इंग्लंड नेहमीप्रमाणे अपयशी ठरला आणि इटलीने यावेळीही बाजी मारली. आपला तिसरा विश्वचषक खेळणाऱ्या इटलीच्या ३५ वर्षीय आद्रे पिर्लेने मैदानाच्या मध्यभागात वर्चस्व राखत इटलीच्या खेळात सातत्य राखले. इटलीच्या मार्सीसीने पहिला गोल केला, तर इंग्लंडनेही प्रतिहल्ल्यात स्टरीडगेच्या गोलद्वारे बरोबरी साधली. मात्र नेहमीच चर्चेत असणाऱ्या खतरनाक बालाटोलीने निर्णायक गोल करत आपणही नेमार, मेस्सी, रोनाल्डो यांच्याबरोबर रेसमध्ये आहोत याची प्रचिती दिली. इटलीने या विजयामुळे गत विश्वचषकातील आपला दुष्काळ तर संपवलाच शिवाय अझ्झुरी या नावाने परिचित असणाऱ्या इटलीने पुढील वाटचालीसाठी महत्त्वाच्या ३ गुणांची कमाई केली. ‘क’ गटातील झालेल्या दुसऱ्या सामन्यात आशिया खंडाचे प्रतिनिधित्व करणारा जपानचा संघ यावेळी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचेच लक्ष होते. जपान-आयव्हरी कोस्टा या सामन्यात कोस्टाचे मानांकन १७वे असले तरी ४४वे मानांकन असणाऱ्या आशियाच्या या ब्लू समोराईचा मागील विश्वचषकातील खेळ बघता यावेळीही ते हा सामना जिंकतील असे वाटत होते. मात्र फॉक्स आॅन द बॉक्स ही बिरुदावली मिळविलेल्या आणि प्रीमियर लिग गाजवलेला चेल्सी संघाचा माजी खेळाडू (सध्या तो गालाटासरी या संघाकडून खेळत आहे) डिडीएर द्रोग्बा याच्या दुसऱ्या सत्रातील आगमनाने चार्ज झालेल्या आफ्रिकन एलिफंटनी या ब्लू समुराईला (जपानला) निष्प्रभच करून टाकले आणि दोन मिनिटांच्या अंतराने चक्क दोन गोल लगावले. त्यामुळे पूर्वार्धात जपानच्या होंडाने मिळवून दिलेली आघाडी कमी पडली.जर्मनी आणि पोर्तुगाल सामन्यावर नजर : आज चौथा हाय प्रोफाईल सामना होत आहे तो म्हणजे जर्मनी आणि पोर्तुगाल यांच्यामध्ये या सामन्यातील निकालापेक्षा पोर्तुगालच्या ख्रिस्टीयानो रोनाल्डो हा फिलीप लॉम, बास्तीन स्वानस्टायगर, मेसुट ओझेल, मिलोस्लाव क्लोस, लुकास पोडस्की, थॉमस मुल्लर अशा एकपेक्षा एक सरस असणाऱ्या जर्मन आर्मीशी कसा मुकाबला करता याकडे सर्वांचे लक्ष लागले असणार यात शंकाच नाही. याबरोबर ‘ग’ या गटातील घाना-अमेरिका हा सामना होत आहे. या दोन्हीही संघांचा दर्जा सारखाच असल्यामुळे या सामन्यातही चांगला संघर्ष बघायला मिळेल. ‘फ’ गटात होणाऱ्या इराण-नायजेरिया या सामन्यात नायजेरियाचेच पारडे जड असले तरी आशियाचा आणखी एक प्रतिनिधी चांगली लढत देईल असा विश्वास ठेवायला काही हरकत नाही.