वणी : दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित अनुदानित आश्रमशाळेचे कामकाज असमाधानकारक असून, शैक्षणिक गुणवत्तेचा ढासळलेला दर्जा स्वच्छतागृहांची दुरवस्था, निवास व्यवस्थेतील समस्या, दर्जा नसलेले भोजन यामुळे वारंवार तक्र ारी करूनही कार्यप्रणालीत सुधारणा न झाल्याने नाराजीचे वातावरण आहे. दहावर्षीय विद्यार्थी आनंदा जनार्दन गावित या चौथीच्या विद्यार्थ्याला सुरेश नामदेव जाधव या शिक्षकाने मारहाण केल्याप्रकरणी प्रकाशझोतात आलेल्या या आश्रमशाळेबाबत कमालीची प्रतिकूल कार्यप्रणालीची भावना जोपुळ ग्रामस्थांच्या आहेत. १९९४ साली जोपुळ गावात ही आश्रमशाळा सुरू करण्यात आली. सन २०१२ पासून जोपुळ-पिंपळगाव रस्त्यावरील नूतन इमारतीत ही आश्रमशाळा स्थलांतरित करण्यात आली. ग्रामपंचायतीचे कार्यकारी मंडळ व ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेत याबाबत वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याची माहिती सरपंच अशोक भोई यांनी दिली. भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष जयेश गांगुर्डे, सरपंच अशोक भोई, उपसरपंच माधव उगले, एकनाथ बुरडे, नंदू बोंबले, जयराम उगले, ग्रामपंचायत सदस्य मालती वाटाणे, उषाराणी गांगुर्डे, अंबादास गांगुर्डे, मंगेश गांगुर्डे, बाबा अहेर, मोहन उगले महेश उगले, दीपक गायकवाड, श्रीकांत अहेर यांनी आश्रमशाळेच्या कामकाजाबाबत नापसंती व्यक्त करून कारवाईची मागणी केली. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संस्था प्रतिनिधी नरेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता इमारतीच्या बांधकामाला पस्तीस ते चाळीस लाख रु पये खर्च करण्यात आला आहे. शासनाकडून मात्र नऊशे रु पये प्रति विद्यार्थी असे अनुदान दर महिन्याला मिळते. बाकीच्या सुविधा मूलभूत खर्च करणे आवाक्याबाहेर होते. कपडे, तेल, साबण व तत्सम सुविधा देण्याबाबत संस्था अग्रक्र म देते. (वार्ताहर)
जोपुळ येथील आश्रमशाळेची दुरवस्था
By admin | Updated: October 4, 2015 22:03 IST