नांदगाव : येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा विद्यार्थी आर्यन अनिल धोंडगे याने तयार केलेला उपग्रह हेलियम वायुच्या फुग्यातुन आकाशात झेपावताच त्याच्या शिक्षक आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. भारतातून आलेल्या इतर ९९ विद्यार्थ्यांबरोबर त्याचा हा १०० वा उपग्रह होता. आर्यनला पोस्टाने विविध संस्थांचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले. आर्यनची कथा स्वरचित आहे. वृत्तपत्रातून त्याला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम या संस्थेची उपग्रह बनवा अशी बातमी समजली. त्यानंतर कलाम फाउंडेशनशी ऑनलाइन संपर्क करुन सगळे बारकावे समजून घेतले व परीक्षा देऊन रजिस्ट्रेशन केले.
उपग्रह बनविण्याचे ऑनलाइन ट्रेनिंग घेऊन पुणे येथील जयवंतराव इंजिनिअरिंग कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत आर्यनने प्रत्यक्ष सहभाग घेतला. अत्यंत मेहनतीने बारकावे समजून घेत उपग्रह बनविला. रामेश्वरमला जाऊन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मभूमीत त्यांचे १०० उपग्रहांचे स्वप्न साकार झाल्याचा अनुभव त्याला मिळाला.
------------------
विश्वविक्रमाची नोंद अन् आर्यनची धडपड
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज २०२१ या हेलियम बलून मधील १०० उपग्रहांच्या उड्डाणाच्या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक, वर्ल्ड बुक रेकॉर्ड लंडन, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यात करण्यात आली. आर्यनला मिलिंद चौधरी, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी व महाराष्ट्र समन्वयक मनीषा चौधरी, किशोर निकम यांचे मार्गदर्शन मिळाले. कोरोना काळात शिक्षण ठप्प झाले होते. दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली होती. त्या काळात आर्यनने केलेली धडपड कौतुकास्पद आहे.
--------------------
भारतातून हेलियम बलूनमधून १०० उपग्रह अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम बघण्याचे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांचे स्वप्न होते. त्या १०० उपग्रहात माझ्या उपग्रहाचा समावेश झाला. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.
-आर्यन धोंडगे, नांदगाव
(१६ आर्यन धोंडगे)
===Photopath===
160621\16nsk_6_16062021_13.jpg
===Caption===
१६ आर्यन धोंडगे