शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयातून घडतो कलाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:39 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज फिल्म सोसायटीतर्फे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना गुरुवारी (दि.१४) ‘झेनिथ एशिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेल्या प्रथम आशियायी चित्रपट महोत्सवात माजीमंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सोनाली कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देसोनाली कुलकर्णी : ‘झेनिथ एशिया’ पुरस्कार प्रदान

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज फिल्म सोसायटीतर्फे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना गुरुवारी (दि.१४) ‘झेनिथ एशिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेल्या प्रथम आशियायी चित्रपट महोत्सवात माजीमंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सोनाली कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, कलाकार हा मातीच्या ओल्या गोळ्याप्रमाणे असतो. त्याला दिग्दर्शक कुंभाराप्रमाणे आकार देत असतो. त्यातूनच अभिनय क्षेत्रातील कलाकार घडत जातो़कुसुमाग्रज स्मारकात रंगलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर लोकेश शेवडे यांनी सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या माध्यमातून विचारलेल्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे देताना कुलकर्णी यांनी त्यांचा क लाक्षेत्रातील नाटक, चित्रपट, लेखन, दिग्दर्शन असा बहुआयामी प्रवास नाशिककर रसिंकासमोर उलगडला. त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील ‘व्हाइट लीली’ या नाटकापासून ते रमाबाई आंबेडकर, मिशन काश्मीर, डॉ. प्रकाश बाबा आमटे, दोघी, कच्चा लिंबू, गुलाबजामस आदी विविध चित्रपटांमधील भूमिका साकारताना आलेला अनुभव व विविध किस्से प्रेक्षकांसमोर माडले. तसेच आपल्या अभिनय प्रवासातही विविध दिग्दर्शकांनी उल्लेखनीय मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे कलाकारांनी चित्रपट अथवा नाटकाची निवड करताना संहिता वाचून किंवा ऐकून भूमिका करण्याचा निर्णय घेतेलेला असतो. त्यामुळे काम सुरू झाल्यानंतर दिग्दर्शक भूमिकेजी गरज ओळखून ज्या गोष्टी सांगतो त्या कलाकारांनी स्वीकारण्यात काहीही गैर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘मिशन क ाश्मीर’ चित्रपटाच्या राष्ट्रपती भवनातील सादरीकरणावेळी तत्कालीन राष्ट्रपतींकडून ‘रमाबाई आंबेडकर’ चित्रपटातील रमा भूमिकेला मिळालेली दाद आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विनायक रानडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.सोनाली कुलकर्णी ‘खुदाबख्श’ व्यक्तिमत्वलेखिका, कवयित्री, अभिनेत्री असलेल्या सोनाली कुलकर्णी सिनेमा, थेटरही करतात. त्यांच्या अंगी बहुकलागुण असतानाही त्यांनी आपल्या आवडीचा छंद व्यवसाय म्हणून निवडला. आवडीचा छंद व्यवसाय म्हणून निवडण्याची संधी मिळाल्याने त्या विशेष भाग्यवंत असून, त्यांच्यावर ईश्वराची खास कृपादृष्टी आहे. बहुकलांनी संपन्न असलेल्या या अभिनेत्री ‘खुदाबख्श’ व्यक्तिमत्व असल्याचे प्र्रतिपादन माजीमंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केले.

टॅग्स :NashikनाशिकSonali Kulkarniसोनाली कुलकर्णीcultureसांस्कृतिक