शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कलात्मक पुष्परचनेचा आविष्कार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:19 IST

श्री गणरायाचे साकारलेले रूप... श्री बालाजी देवस्थान, सप्तशृंगी देवी मंदिरासह इस्कॉन मंदिराचा उभारलेला गाभारा...यांसह ग्लोबल वॉर्मिंग, सायकल चळवळ आणि लहान बाळांच्या गोजिरवाण्या रूपाभोवती केलेल्या कलात्मक पुष्परचनेने नाशिककर पुष्पप्रेमींना मोहिनी घातली.

नाशिक : श्री गणरायाचे साकारलेले रूप... श्री बालाजी देवस्थान, सप्तशृंगी देवी मंदिरासह इस्कॉन मंदिराचा उभारलेला गाभारा...यांसह ग्लोबल वॉर्मिंग, सायकल चळवळ आणि लहान बाळांच्या गोजिरवाण्या रूपाभोवती केलेल्या कलात्मक पुष्परचनेने नाशिककर पुष्पप्रेमींना मोहिनी घातली. निमित्त होते, पुष्परचनाकार अवधुत देशपांडे यांच्या संकल्पनेतून आयोजित पुष्प उत्सव-२०१८चे प्रजासत्ताक दिनाप्रसंगी या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांच्या हस्ते करण्यात आले. गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आकर्षक पद्धतीने एकापेक्षा एक सरस भन्नाट संकल्पनेचा वापर करत केलेल्या पुष्पसजावटीने नाशिककरांना आकर्षित केले. यावेळी तरुण-तरुणींनी पुष्पसजावटीसोबत सेल्फी काढत सोशल मीडियावर ‘पोस्ट’ही केली. सर्वांसाठी मोफत असलेल्या या प्रदर्शनाला नाशिकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे गावाचा परिसरापासून ते ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत आणि सायकल चळवळीपासून ते गिटारपर्यंत असे विविध विषय पुष्परचनेच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी दिसून येते.  आकर्षकपणे विविध जातीच्या फुलांचा वापर करत साकारलेल्या प्रतिकृती न्याहाळताना पुष्पप्रेमी हरवून गेले होते. या प्रदर्शनाचा समारोप रविवारी (दि.२८) संध्याकाळी करण्यात आला.४० संकल्पनांचा मेळ वैश्विक तपमानवाढ, त्सुनामी, वैद्यकीय व्यवसाय, हृदयरोग जागृती अशा एकू ण ४० संकल्पनांचा मेळ या पुष्प प्रदर्शनात आपल्या कलेतून देशपांडे यांनी घालण्याचा प्रयत्न केला होता. केवळ नैसर्गिक घटकांचा वापर करत पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत पुष्पसजावट करण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून आले. एकूणच या आगळ्या-वेगळ्या पुष्प उत्सवाने नाशिककरांना भुरळ घातली.

टॅग्स :Nashikनाशिक