शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी येथे पाइपलाइन फुटल्याने कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:29 IST

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू जलकुंभापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर जामनदी-पात्रात आहे. तेथून जलकुंभापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. येथे रयत शिक्षण संस्थेच्या संत हरिबाबा विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामास प्रारंभ झाला आहे. इमारतीसाठी पाया खोदत असताना पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीला धक्का लागून ती फुटली. जलवाहिनी फुटल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सदर जलवाहिनी बऱ्याच वर्षांपूर्वीची व सिमेंट पाइप असल्याने त्या साइजचा पाइप मिळणे अवघड झाले आहे. तसेच आता या जागेवर इमारत बांधकाम होणार असून, भविष्यात गळती झाल्यास गळती काढणे अवघड जाणार असल्याने ग्रामपंचायतीने जलवाहिनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजून दोन दिवस पांगरीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिनीचे तातडीने स्थलांतर करून पाणीटंचाई दूर करण्याची मागणी प्रकाश पांगारकर, सुनील निरगुडे, युनुस कादरी, सुनील पेखळे, राजू निखाडे आदींसह ग्रामस्थ व महिलावर्गाने केली आहे.भविष्यात जलवाहिनी फुटू नये त्याकरिता मोकळ्या जागेवरून जलवाहिनी स्थलांतर करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच काम पूर्ण होऊन लवकरात लवकर ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- ज्ञानेश्वर पांगारकर,सरपंच, पांगरी------------------------सुमारे ३५ वर्षांपूर्वीची जलवाहिनी असल्याने त्याचे साहित्य मिळणे अवघड झाल्याने नवीन चार इंच व सहा केजी जलवाहिनी टाकत आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामस्थांनी सहकार्य करावे.- पी. आर. बोरसे, ग्रामविकास अधिकारी, पांगरी.