शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातही मिळणार कृत्रिम बुद्धिमत्ता अभियांत्रिकीचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:29 IST

दिवसेंदिवस कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारीत ऑटोमायझेशनचा वापर वाढत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा ऑटोमयझेशनचा कणा असून विकसित देशात त्याचा वापर आता सर्वच क्षेत्रात होत असून भारतातही हे तंत्र विकसित होत असताना नाशिकमधील विद्यार्थ्यांनाही आता कृत्रिम बुद्धीमत्ता अभियांत्रिकीचे शिक्षण मिळू शकणार आहे.

ठळक मुद्देनाशकात मिळणार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अभियांत्रिकीचे शिक्षणभारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मातोश्री महाविद्यालयास परवानगी

नाशिक : औद्योगिक क्षेत्रामध्ये मानवी बळाचा वापर कमी होत असून दिवसेंदिवस कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारीत ऑटोमायझेशनचा वापर वाढत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा ऑटोमयझेशनचा कणा असून विकसित देशात त्याचा वापर आता सर्वच क्षेत्रात होत असून भारतातही हे तंत्र विकसित होत असताना नाशिकमधील विद्यार्थ्यांनाही आता कृत्रिम बुद्धीमत्ता अभियांत्रिकीचे शिक्षण मिळू शकणार आहे.  देशाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे उपग्रह, क्षेपणास्त्रे, रणगाडे, दळण वळण या क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर वाढत आहे. विविध वाहनांमध्ये आता चालकाचे काम आता  कृत्रिम बुद्धीमत्ता आधारीत यंत्रणा करीत असून यापूर्वी अशक्य असणाऱ्या किंवा आता चमत्कार वाटणाऱ्या काही गोष्टी या तंत्रज्ञानाने शक्य होणार आहे. भविष्यात या क्षेत्रात होणारा विकास, निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी याचा फायदा घेण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक येथील मातोश्री शिक्षण संस्थेचे मातोश्री अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाने या शैक्षणिक वर्षापासून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या अभियांत्रिकी शाखेची मागणी केली होती. त्यासाठी महाविद्यालयातील प्रशिक्षक वर्ग, प्रयोगशाळा यांच्या आधारे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने महाविद्यालयात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या चार वर्षाच्या अभ्यासक्रमास मान्यता दिल्यामुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अभियांत्रिकी शिक्षणाचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञानcollegeमहाविद्यालय