शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात कृत्रिम खतटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:42 IST

येवला : तालुक्यात प्रारंभीच्या दमदार पावसाने खरीप हंगामाच्या वेगाने पेरण्या पूर्ण झाल्या. खरीप पिके जोमात आहेत. कोळपणी व इतर शेतीकामे आटोपल्याने आता, पिकांना खतांची मात्रा देणे गरजेचे असताना तालुक्यात रासायनिक खतांची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात असून, खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत.

येवला : तालुक्यात प्रारंभीच्या दमदार पावसाने खरीप हंगामाच्या वेगाने पेरण्या पूर्ण झाल्या. खरीप पिके जोमात आहेत. कोळपणी व इतर शेतीकामे आटोपल्याने आता, पिकांना खतांची मात्रा देणे गरजेचे असताना तालुक्यात रासायनिक खतांची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात असून, खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत.सद्यस्थितीला तालुक्यातील खत विक्री दुकानांवर व विविध शेतकरी संघाकडे खत उपलब्ध नसल्याचे बोर्ड झळकत आहे. खरीप हंगामातील पीक सध्या वाढीच्या टप्प्यावर असताना नत्र खतांची गरज आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाची खतांसाठी शोधाशोध सुरू आहे.येवला तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक खतसाठा दिल्या गेल्याचे सांगितले जात असताना खतटंचाई निर्माण झाली कशी, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या काही दिवसांत खतांचा काळाबाजार, जादा दराने खत विक्र ी, लिकिंग अशा तक्र ारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. तक्रारींच्या वाढत्या संख्येने स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरावरून भरारी पथकेही तालुक्यात सक्रिय झाली. पण यानंतर तालुक्यात खत मिळेनाशी झाली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मा योजनेत बांधावर बी-बियाणे व खते पुरविण्याची घोषणा कृषी विभागाकडून केली होती. तालुक्यात स्थानिक यंत्रणेने अनेक गावात बांधावर बी-बियाणे व खतेही वाटप केलेत; मात्र सर्वसामान्य शेतकºयांना अपेक्षित खत आजही मिळत नसल्याचे चित्र आहे.तालुक्यात तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जाते.शेतकरीवर्गाची खतांसाठी शोधाशोध.तालुक्यात स्थानिक यंत्रणेने अनेक गावात बांधावर बी-बियाणे व खतेही वाटप.

टॅग्स :Nashikनाशिक