शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कलम १४४ 'जैसे थे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:57 IST

नाशिक : लॉकडाउनची मुदत १७ मे पर्यंत केंद्र सरकारकडून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत भादंवि कलम १४४ जैसे थे ठेवले असून, यानुसार जमावबंदी, संचारबंदीचा कालावधीदेखील वाढविण्यात आला आहे.

नाशिक : लॉकडाउनची मुदत १७ मे पर्यंत केंद्र सरकारकडून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत भादंवि कलम १४४ जैसे थे ठेवले असून, यानुसार जमावबंदी, संचारबंदीचा कालावधीदेखील वाढविण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आयुक्तालय हद्दीत सर्वच पोलिस ठाण्याकडून धडक कारवाई केली जाणार आहे.मालेगावसह शहर, ग्रामीण भागातदेखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनसह शासनाच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तरच कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी म्हटले आहे. भाजीपाला, दूधविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळमर्यादेचे पालन करावे. 'डिस्टन्स' ठेवण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. शहरात कोरोना विषाणूंचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा १८९७ हा १३ मार्चपासूनलागू करून त्या तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेलीआहे.त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय सरकारने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात लोकांनी येऊ नये, तसेच सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक असल्यामुळे नांगरे पाटीलयांनी कलम १४४चा कालावधी वाढविला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक