शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फिरत्या वस्तुसंग्रहालयाचे मालेगावी आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 19:34 IST

मालेगाव : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या संग्रहालयाचे (म्युझियम ऑन व्हील्स) आगमन सोमवारी (दि २७) मालेगावात झाले. या फिरत्या प्रदर्शनाचा मुक्काम मालेगाव येथे असून तालुक्यातील पाच विविध शाळांमध्ये हे फिरते प्रदर्शन जाणार आहे.

ठळक मुद्दे विद्यालयाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला.

मालेगाव : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या संग्रहालयाचे (म्युझियम ऑन व्हील्स) आगमन सोमवारी (दि २७) मालेगावात झाले. या फिरत्या प्रदर्शनाचा मुक्काम मालेगाव येथे असून तालुक्यातील पाच विविध शाळांमध्ये हे फिरते प्रदर्शन जाणार आहे.फिरत्या प्रदर्शनाचा पहिला कार्यक्रम सांजवहाळ येथील भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश पाटील होते. शिक्षक विनोद भामरे यांनी विद्यालयाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. संग्रहालयाच्या प्रकल्प व्यवस्थापक कृतिका म्हात्रे यांनी छत्रपती शिवाजीमहाराज वस्तू संग्रहालयाची तसेच फिरत्या प्रदर्शनाची माहिती दृकश्राव्य माध्यमाद्वारे दिली. फिरत्या प्रदर्शनाला जोडून " शिक्षणात संग्रहालयांची भूमिका " या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकर्ते संजय पाठक यांनी परिसंवादात सहभागी झालेल्या शिक्षकांना मार्गदर्शन केले. परंपरा, इतिहास आणि संस्कृतीचे जतन करण्याचे काम संग्रहालये करत असतात असे प्रतिपादन पाठक यांनी याप्रसंगी केले. मोठ्या आकाराच्या दोन बसमधून दोन प्रदर्शने मांडण्यात आली आहेत.संगीतविषयक प्रदर्शनएका बसमधील प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास मांडण्यात आला आहे. तर दुसऱ्या बसमध्ये '' इन ट्यून '' हे संगीतविषयक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तबला, संतूर , सतार , गिटार, बासरी आदी वाद्यांच्या माध्यमातून ध्वनी पासून संगीतापर्यंत झालेला प्रवास मांडण्यात आला आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील शिक्षण मदतनीस रिमा जैस्वाल , आत्रेयी चक्रवर्ती , गौरव जाधव आदी उपस्थित होते . 

टॅग्स :MalegaonमालेगांवStudentविद्यार्थी