शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी रंगीबेरंगी राख्यांचे बाजारात आगमन

By admin | Updated: August 8, 2014 00:53 IST

मालेगावी रंगीबेरंगी राख्यांचे बाजारात आगमन

 

मालेगाव : बहीण-भावामधील अतूट नात्याच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला केवळ काही दिवसच बाकी असल्याने आकर्षक राख्यांनी मालेगावची बाजारपेठ सजली असून, महिलावर्गाने खरेदीसाठी गर्दी केल्याने गजबजून गेली आहे. बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये कार्टून, चमकी या पारंपरिक राख्यांसहित धातूच्या राख्या आणि पंतप्रधान मोदींचा मुखवटा असलेल्या राख्याही उपलब्ध झाल्या आहेत. बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण असलेला रक्षाबंधन येत्या रविवारी सर्वत्र साजरा होत आहे. मालेगाव शहरातील संगमेश्वरातील महात्मा फुले रोड, मोसमपूल, महादेव मंदिर, सरदार चौक, रामसेतू, सपाटी बाजार, रावळगाव नाका, कॅम्प मेनरोड, सटाणा नाका आदि भागातील दुकानांच्या अग्रभागी विविध आकारातील आकर्षक राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. काही ठिकाणी विशेष स्टॉल्स् उभारण्यात आले आहेत. शहर परिसरातून अनेक सासरवाशिण महिला बाहेरगावी राहणाऱ्या आपल्या लाडक्या भावास राख्या पाठविण्यास सध्या मग्न आहेत. पोस्टाद्वारे वा कुरिअरद्वारे राख्या पाठविल्या जात आहेत. दुपारनंतर बाजारपेठांमध्ये महिलांची गर्दी दिसून येत आहे. कोलकत्ता, मुंबई आदि ठिकाणांहून राख्या उपलब्ध होत असून, वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्याने राख्यांच्या किमती १५ ते २० टक्के वाढल्या आहेत. शहरातील सराफ व्यावसायिकांकडे सोने व चांदीपासून तयार केलेल्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध असून, या राख्यांना उच्च वर्गाकडून चांगली मागणी असल्याचे गोविंद दुसाने (सराफ) या पेढीचे राजेश दुसाने यांनी सांगितले. याशिवाय लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी विविध भेटवस्तू, तयार कपडे, साड्या, दागिने यांचीही बाजारपेठेत रेलचेल दिसून येत आहे.(वार्ताहर)