शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील मोबाईलच्या दुकानातून ४४ मोबाईल पळवून पुण्यात विक्री करणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 21:09 IST

मोबाइल पुण्याच्या राजगुरूनरमधील नागेश बापू मेमाने यांच्या दुकानातून खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे राजगुरूनगरमधील मोबाइल विक्रेता मेमानेच्या मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्दे४३ मोबाइल, डीव्हीआर, वायफाय हस्तगत मोबाइल शॉपीमध्ये नंदू परदेशी अत्राम याने दुकानाची खिडकी मध्यरात्री तोडली

नाशिक : काठे गल्ली परिसरातील एका मोबाइल विक्रीच्या दुकानावर पाळत ठेवून मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाची खिडकी तोडून प्रवेश करत सुमारे सहा लाख ४७ हजारांचे मोबाइल लंपास करणार्‍या मुख्य सूत्रधारासह चौघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बनकर चौकामधील शुभवास्तू अपार्टमेंटच्या १२ क्रमांकाच्या गाळ्यातील मोबाइल शॉपीमध्ये नंदू परदेशी अत्राम याने पाळत ठेवून दुकानाची खिडकी मध्यरात्री तोडली. खिडकीचे गज वाकवून दुकानात प्रवेश करून विक्रीसाठी ठेवलेले विविध कंपन्यांचे महागडे ४४ अ‍ॅन्ड्राईड मोबाइल घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी सुहाग विष्णुभाई पटेल (३३, रा. जनरल वैद्यनगर) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे होता. साबळे यांनी गुन्ह्यातील चोरीला गेलेले मोबाइल पुण्यामधील धानोरीला वापरले जात असल्याची माहिती मिळविली. गुन्हे शोध पथकासह साबळे यांनी धानोरी गाठून मोबाइलचा वापर करणारे अनिल बबन केंगळे, संदीप शंकर टिंगरे, सागर बाजीराव फराटे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मोबाइल पुण्याच्या राजगुरूनरमधील नागेश बापू मेमाने यांच्या दुकानातून खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे राजगुरूनगरमधील मोबाइल विक्रेता मेमानेच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, त्याने सागर मुरलीधर आंबेकर (रा. वाघाडी, पंचवटी) याने त्याचा मित्र नंदूकडून मोबाइल घेऊन दुकानात आणून दिले व आंबेकर हा माझा मावसभाऊ आहे, अशी कबुली दिली. पोलिसांनी अत्राम या मुख्य सूत्रधारासह आंबेकर व मोबाइल विक्रेता मेमाने यास अटक केली आहे. या गुन्ह्यात चोरीचे मोबाइल खरेदी के ल्याप्रकरणी केंगळे, टिंगरे, फराटे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ४३ मोबाइल, डीव्हीआर, वायफाय हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दुकानामध्ये चोरी करताना दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे अत्राम याच्या लक्षात आल्याने डीव्हीआर यंत्र त्याने पळविले होते.

टॅग्स :NashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणे