नाशिक : चोरीच्या उद्देशाने दडून बसलेल्या चोरट्यास मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे़ गोपाल रामसिंग गेडा (३६ रा. सूर्या हॉटेल मागे, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक) असे या संशयिताचे नाव आहे. बुधवारी (दि़ १९) रात्री दीड वाजेच्या सुमारास तो गोविंदनगर येथील प्रकाश पेट्रोल पंपाजवळील डाटा मॅट्रिक्स या इमारतीजवळ दडून बसलेला होता. मुंबई नाका पोलिसांच्या गस्ती पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला़ (प्रतिनिधी)
चोरीच्या उद्देशाने बसलेल्यास अटक
By admin | Updated: April 20, 2017 18:07 IST