शिरपूर जैन (जि. वाशिम): अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्या मालेगाव तालुक्यातील चांडस येथील मंगेश नामदेव सातपुते या युवकास शिरपूर पोलिसांनी पळविलेल्या मुलीसह नाशिक येथून रविवारी ताब्यात घेतले.मागील महिन्यात शिरपूर पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या चांडस येथील एका अल्पवयीन मुलीस मंगेश सातपुते याने पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस आरोपीच्या मागावर होते. दरम्यान, २४ जुलै रोजी शिरपूर पोलीस पथकाला नाशिक येथे मंगेश सातपुते आढळून आला. आरोपी मुलगा आणि संबंधित मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना शिरपूर ठाण्यात आणण्यात आले. आरोपीविरुद्ध यापूर्वीच कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल असल्याने त्यास अटक करण्यात आली. पळविलेल्या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत शिरपूर जैन पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीस पळविणा-या आरोपीस नाशिकमध्ये अटक
By admin | Updated: July 26, 2016 00:51 IST