जायखेडा : वडिलोपार्जित शेतजमिनीची खातेफोड करून देण्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नामपूर येथील लाचखोर तलाठ्यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून गजाआड केले. तक्रारदार शेतकऱ्याच्या शेती गट क्र. ६८/०२ ची खातेफोड करून देण्याच्या मोबदल्यात नामपूर येथील तलाठी राजेंद्र बारकू गुंजाळ यांनी सहा हजार रुपयांची मागणी केली होती. या पैशांची लाच स्वीकारताना नामपूर येथील कार्यालयात राजेंद्र गुंजाळ यास अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे अधिकारी पी. एन. चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जात असल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ०२५५३-२५७५६२८, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक अनिल बोरसे यांनी केले आहे.
नामपूर येथे तलाठ्याला लाच घेताना अटक
By admin | Updated: July 26, 2014 00:53 IST