शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक

By admin | Updated: October 14, 2015 23:37 IST

वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक

मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात कनिष्ठ अभियंता सचिन सखाराम पवार यांना आज दुपारी पंधराशे रुपये लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.आघार (खु।।) येथील शेतकऱ्याने गट नंबर ५४९ येथे वीजजोडणीसाठी अधिकृतरीत्या मागणी केलेली होती. त्यासाठी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरही वीज वितरण कार्यालयाने वीजजोडणी दिली नाही म्हणून त्याने पिके वाया जात असल्याचे पाहून वीज वितरण कंपनीच्या तारांवर आकडा टाकून वीज घेतली असता तीन ते चार दिवसांपूर्वी त्याला पवार यांनी पकडले होते. या प्रकरणी एकतर दंड भरण्याची किंवा गुन्हा दाखल करण्याची कारवाई टाळण्यासाठी पवार यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यात पंधराशे रुपयात तडजोड करण्यात आली होती. शेतकऱ्याने नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या दूरध्वनीवर तक्रार केली असता नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक कर्पे व त्यांचे सहकारी हवालदार दिलीप ढुमणे, पोलीस शिपाई विलास वाघ यांनी सापळा रचत आज दुपारी चारच्या सुमारास पवार यांना दाभाडी येथे लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले. (वार्ताहर)